परभणीतील आठ तालुक्यांवर दुष्काळाची छाया
परभणीतील आठ तालुक्यांवर दुष्काळाची छाया 
मुख्य बातम्या

परभणीतील आठ तालुक्यांवर दुष्काळाची छाया

टीम अॅग्रोवन

परभणी ः केंद्र आणि राज्य शासनाच्या दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांनुसार परभणी जिल्ह्यातील ९ पैकी ८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची प्रथम कळ (ट्रिगर-१) लागू होत आहे. त्यासाठी अनिवार्य आणि प्रभावदर्शक निर्देशांकानुसार अपेक्षित पावसाच्या सरासरी टक्केवारीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पीक उत्पादन नुकसान; तसेच पाणीटंचाईची माहिती सादर करावी. टंचाई आराखडे तयार करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिले.

जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. ९) आयोजित बैठकीत श्री. शिवाशंकर बोलत होते. या वेळी अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी विश्वांभर गावंडे, स्वाती सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

यंदा परभणी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम या ८ तालुक्यांसह पूर्णा अशा एकूण ९ तालुक्यांतील दुष्काळ मूल्यांकनासाठी सत्यमापन अहवाल; तसेच दुष्काळ व्यवस्थापन उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत.

प्रस्तावासाठी विविध प्रकारच्या ५ मुद्यांच्या परिस्थितीचा आधार घेतला जाणार आहे. यातील जलसाठे, पीक क्षेत्रीय सर्व्हेक्षण, मृदा आर्द्रता आदी महत्त्वाचे मुद्दे आहेत. यासाठी सर्व संबंधितांनी दोन दिवसांत पीक सर्व्हेक्षण अहवाल मोबाईल ॲपद्वारे अपलोड करावेत. नापेर क्षेत्राची माहिती द्यावी. दुष्काळाची कळ लागू झालेल्या तालुक्यातील गावांची निवड जिल्हास्तरावर होईल. सर्व्हेक्षण, सत्यमापन करण्यासाठी तालुका, क्षेत्रीय स्तरावर समिती नेमली जाणार आहे.

हंगामातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारे छायाचित्रे जीपीएस लोकेशनसह अपलोड करण्यात येतील. पिकांच्या उगवणीवर वाढीवर कमी पावसाचा झालेला परिणाम, उत्पादनात येणारी तुट यांची माहिती नोंदवली जाणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर आणि जानेवारी ते मार्च कालावधीसाठीचे टंचाई आराखडे तयार करून २० ऑक्टोबरपूर्वी सादर करावेत.

दुष्काळासाठी दक्ष राहण्याच्या सूचना पाण्याचे स्राेत निश्चित करून पाणीटंचाई परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी करावी. विहीर अधिग्रहणे करणे, सार्वजनिक पाणी स्राेतांच्या परिसरातील पाणीउपसा बंद करावा. या वेळी चाराटंचाईसाठी चारा नियोजन, जलयुक्त शिवारमधील कामांचा आढावा घेण्यात आला. दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दक्ष राहण्याचा सूचना या वेळी देण्यात आल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

Education Fund : रानमसलेच्या प्राथमिक शाळेसाठी ‘लक्ष्मी’कडून सव्वा कोटींचा निधी

Lake Conservation : जैवविविधतेच्या बळावर ‘त्या’ करतात तलावाचे संवर्धन

SCROLL FOR NEXT