जालना येथे ड्रायरसह गोदामाचे उदघाटन
जालना येथे ड्रायरसह गोदामाचे उदघाटन 
मुख्य बातम्या

जालना रेशीम कोष खरेदी बाजारात आता ड्रायर, साठवणुकीची सोय

टीम अॅग्रोवन

जालना   : येथील बाजार समितीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत आता ड्रायर व साठवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता रेशीम उत्पादकांना त्याचा माल विकायचा नसल्यास ड्रायरचा वापर करून साठवणूक करून ठेवण्याची सुविधा मिळणार आहे.

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ७) ड्रायर व साठवणुकीसाठीच्या क्रेटसहीत असलेल्या गोदामाचे उद्‌घाटन झाले. या वेळी रेशीम विभागाचे सहायक संचालक दिलीप हाके, जिल्हा रेशीम विकास अधिकारी व्ही. एम. भांगे, बाजार समितीचे पदाधिकारी व संचालक, व्यापारी उपस्थित होते.

जालना येथील रेशीम कोष खरेदी बाजारात एकावेळी १०० किलो कोष ड्राय करण्याची क्षमता असलेले ड्रायर देण्यात आले आहे. शिवाय जवळपास तीन टन कोष साठवणुकीची क्षमता असलेले गोदामही उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये जवळपास चारशी ४०० क्रेटची सोय असेल. जालना बाजार समितीमध्ये २१ एप्रिल ते ७ सप्टेंबरदरम्यान सुमारे २७.५० टन रेशीम कोषाची खरेदी झाली आहे. या कोषांना १२० ते ४२५ रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

शुक्रवारी (ता. ७) बाजारात विक्रीसाठी आलेल्या रेशीम कोषांना १०० ते ३५० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळाला. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पालघर, ठाणे आदी भागातून जालना बाजार समितीमध्ये कोष विक्रीसाठी आले आहेत. उद्‌घाटन सोहळ्यानंतर राज्यमंत्री खोतकर यांनी रेशीम कोष खरेदीत जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले. दिलीप हाके यांनी व्यापाऱ्यांना रेशीम कोष खरेदीत उतरण्याची संधी कशी महत्त्वाची आहे, याबाबत माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT