पाणीटंचाई
पाणीटंचाई 
मुख्य बातम्या

पुणे विभागात पाणीटंचाई वाढली

टीम अॅग्रोवन

पुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात पाणीटंचाई वाढू लागली आहे. पुणे, सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी भागातील पाच तालुक्यांमधील २१ गावे, १७७ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसत असून, सुमारे ३५ हजार नागरिकांची तहान भागविण्यासाठी २० टॅंकर धावत असल्याचे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले. उन्हाचा चटका वाढताच या भागातील पाणीटंचाई आणखी वाढणार आहे.

यंदाचा पावसाळा शेवटच्या टप्प्यात आला असून, लवकरच मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. यंदा पुणे, सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागासह सोलापूर, सांगली जिल्ह्यांतील अनेक भागांत पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे भूजलपातळी खालावली असून, पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडे पडू लागले आहेत. भर पावसाळ्यातही अनेक भागांत टंचाईग्रस्त भागाला टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. आता पावसाळा संपल्यानंतर या भागात पाणीटंचाई तीव्र होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यांमधील १२ गावे, ६६ वाड्यांमध्ये पाणीटंचाई वाढल्याने सुमारे १४ हजार नागरिकांना ८ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवण्यात येत आहे. साताऱ्यातील खटाव आणि माण या तालुक्यांमधील १५ गावे, ६९ वाड्यांमधील २१ हजार नागरिकांना १२ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत पाणीटंचाई भासत नसली तरी पावसाने ओढ दिलेल्या भागात पुढील काळात पाणीटंचाई वाढण्याची शक्यता आहे.  

विभागातील पाणीटंचाईची तालुकानिहाय स्थिती
तालुके   गावे वाड्या टॅंकर
बारामती  ३७
पुरंदर
दौंड
खटाव
माण १२ ६६ १०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT