परभणीत राज्यस्तरीय दुष्काळ शेतकरी मराठी साहित्य संमेलन
परभणीत राज्यस्तरीय दुष्काळ शेतकरी मराठी साहित्य संमेलन 
मुख्य बातम्या

परभणीत राज्यस्तरीय दुष्काळ शेतकरी मराठी साहित्य संमेलन

टीम अॅग्रोवन

परभणी : येथे छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठाणतर्फे रविवारी (ता.१६) एकदिवसीय राज्यस्तरीय दुष्काळ शेतकरी मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे. कवी श्रीकांत देशमुख राहेरीकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.  आयोजक तथा स्वागताध्यक्ष अॅड. विष्णू नवले पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.दुष्काळी स्थितीमुळे संकटात सापडलेल्या राज्यातील शेतक-यांच्या समस्यांवर विचारमंथन करून शेती, माती, शेतकरी यांच्या सर्वंकष उत्थानासाठी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या राज्यस्तरीय दुष्काळ शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन परभणी येथील बी. रघुनाथ सभागृहामध्ये (स्व. आर. आर. आबा पाटील साहित्य नगरी) करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी श्रीकांत देशमुख-राहेरीकर यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार तथा शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते अमर हबीब यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. कवी प्रा. इंद्रजित भालेराव, डॅा. आसाराम लोमटे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. अशोक ढवण आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शेती-शेतकरी-दुष्काळ व साहित्य आणि कार्यकर्त्यांची भूमिका या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॅा. अशोक ढवण राहणार असून साहित्यिक सदानंद देशमुख, शेषराव मोहिते, डॅा. शिवाजी दळणर, डॅा. आसाराम लोमटे यांचा सहभाग असणार आहे. राजेंद्र गहाळ यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन आणि रेणू पाचपोर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस अरुण चव्हाळ, कवी केशव खटींग, राजेंद्र गहाळ, सुनील तुरुकमाने, यशवंत मकरंद, बबन आव्हाड आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT