students
students 
मुख्य बातम्या

पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना गणवेश देणार 

टीम अॅग्रोवन

पुणे: जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांना यंदा दोन गणवेशाचे वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. शासकीय योजनेचा लाभ मिळत नसलेल्या विद्यार्थ्यांना गणवेशाचा पुरवठा करण्यासाठी अंदाजपत्रकात ४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सुमारे ८० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ व शिक्षण समितीचे सभापती रणजीत शिवतरे यांनी दिली. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या आठवीपर्यंत वर्ग असलेल्या तीन हजार ७३७ शाळा आहेत. यामध्ये सुमारे अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी सर्व विद्यार्थिनी, मागासवर्गीय आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुला-मुलींना दरवर्षी प्रत्येकी दोन गणवेशासाठी सरकारकडून अनुदान प्राप्त होते. त्यानुसार प्रति विद्यार्थी सहाशे रुपये निधी उपलब्ध होत होता. परिणामी सर्वसाधारण गट आणि इतर मागासवर्गीय संवर्गातील विद्यार्थी या गणवेशापासून वंचित राहत होतो. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळत नसलेल्या ७९ हजार ७५८ वंचित विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून (सेस फंड) गणवेशासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT