डाॅ. विजय भटकर
डाॅ. विजय भटकर  
मुख्य बातम्या

सामूहिक प्रयत्नातूनच खेड्यांचा विकास शक्यः डॉ. विजय भटकर

टीम अॅग्रोवन

नागपूर ः सामूहिक प्रयत्नांच्या बळावर ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणे शक्‍य आहे. त्याकरिता कृषी, पशू-मत्स्य विद्यापीठाच्या जोडीला पारंपारिक विद्यापीठांनी देखील प्रयत्न करावे. विशेष कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी व्हावी, असे प्रतिपादन उन्नत भारत अभियानाचे प्रमुख डॉ. विजय भटकर यांनी केले.  उन्नत भारत अभियान कृती आराखडा तयार करण्यासंदर्भाने विशेष बैठकीचे आयोजन येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठात करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. डॉ. भटकर म्हणाले, पारंपरिक पिकांच्या जोडीला काही क्षेत्रावर व्यावसायिक पिकांना प्रोत्साहन द्यायला हवे. त्यासोबतच कुक्‍कुटपालन, दूग्धव्यवसाय, बटेरपालन, ॲग्रो टुरिझम व इतर शेतीपूरक व्यवसायाची जोड शेतीला मिळावी, याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल, असे उपक्रम राबविल्या गेल्यास गावखेड्यात देखील आर्थिक समृद्धी नांदण्यास मदत होणार आहे. त्याद्वारे समृद्ध व आशावादी खेडी उभी राहतील. अशा खेड्यांच्या बळावरच सशक्‍त भारताचे निर्माण होणार आहे. त्याकरिता विदर्भातील सर्व विद्यापीठांनी एकत्र येऊन प्राथमिक कृती आराखडा तयार करावा. त्याकरिता पारंपरिक विद्यापीठांनी देखील पुढे आले पाहिजे. विद्यार्थी व शिक्षकांनी या अभियानाअंतर्गत खेड्यात जाऊन काम करावे.  या वेळी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.  श्रीनिवास वरखेडी, उन्नत भारत अभियानाच्या समन्वयक डॉ. अर्चना बारब्दे, सुनील मानसिंका, स्नेहा देशपांडे यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

SCROLL FOR NEXT