Double plant production: Vice Chancellor Dr. Patil
Double plant production: Vice Chancellor Dr. Patil 
मुख्य बातम्या

रोपनिर्मिती दुपटीने वाढवा ः कुलगुरू डॉ. पाटील

टीम अॅग्रोवन

नगर : मध्यवर्ती प्रक्षेत्रावरील रोपवाटिकेतून आंबा, चिकू, सीताफळ, मोसंबी अशा अनेक रोपांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. या रोपवाटिकेतून शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे मिळत आहेत. मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शेतकऱ्यांची वाढीव मागणी पाहता, या सर्व रोपांची निर्मिती दुपटीने वाढविण्याची सूचना कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदभार स्वीकारल्यानंतर कुलगुरूंनी विद्यापीठाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास सुरू केला आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या सर्व प्रक्षेत्रांना त्यांनी भेट दिली. संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना देत मार्गदर्शन केले. विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके, बीजोत्पादन अधिकारी डॉ. चंद्रकांत साळुंखे, प्रक्षेत्रावरील अधिकारी कैलास गागरे, डॉ. मालुंजकर, डॉ. मंजाबापू गावडे उपस्थित होते.

विद्यापीठास बियाणेविक्री, रोपांची विक्री, प्रक्षेत्रावरील फळझाडांच्या लिलावातून मोठ्या प्रमाणावर महसुली उत्पन्न मिळते. विद्यापीठाचे कांदा बियाणे पोलिस बंदोबस्तात विकावे लागते. ऑनलाइन बियाणेविक्री केली असता, काही तासांमध्येच सर्व बियाणे संपून जाते. यामुळे आता बीजोत्पादन, तसेच रोपांची निर्मिती दुपटीने वाढविण्याच्या सूचना कुलगुरूंनी दिल्या आहेत. प्रक्षेत्रावरील उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी डॉ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. कांदा बीजोत्पादन वाढ, मधमाशीपालनाचे महत्त्व, प्रक्षेत्रावरील काडी- कचऱ्याचे कंपोस्टमध्ये रूपांतर करून वापर याबाबत त्यांनी सूचना दिल्या. प्रक्षेत्रावरील उत्पादनवाढीसाठी मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

सात हेक्टरवर होणार आंबा लागवड   महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या स्थापनेपासून धरमाडी टेकडीशेजारी पडीक सात हेक्‍टर जागेत आंब्याच्या केसर वाणाच्या २७०० झाडांची लागवड करण्यात येणार आहे. तसे नियोजन केले जात आहे. त्यामुळे विद्यापीठात आमराई बहरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Storage : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Green Hydrogen Project : हिमाचल प्रदेशच्या झाकरीत देशातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प

Sustainable food : कार्बन फूटप्रिंट की शाश्‍वत अन्न?

Mumbai APMC Scam : संजय पानसरे यांना न्यायालयीन कोठडी

Elephant Issue in Germany : हत्तींवरून दोन देशांमध्ये रणकंदन

SCROLL FOR NEXT