Double compensation to farmers' accounts in Attapadi taluka
Double compensation to farmers' accounts in Attapadi taluka 
मुख्य बातम्या

आटपाडी तालुक्‍यात शेतकऱ्यांच्या खात्यावर दुप्पट भरपाई

टीम अॅग्रोवन

आटपाडी, जि. सांगली : अवकाळी नुकसान अनुदान वाटपात आटपाडी तालुक्‍यात मोठी गडबड झाली आहे. एकट्या कुरुंदवाडीत ४४ शेतकऱ्यांना एकूण आणि बाधित क्षेत्र आणि मंजूर नुकसान भरपाईपेक्षा अनेकांना जादा, दुप्पट-तिप्पट रक्कम दिली आहे. एका कुरूलवाडीत मंजुरी पेक्षा अडीच लाखांचे अधिक वाटप केले आहे. असाच प्रकार इतर गावांतही घडल्याचे उजेडात येऊ लागले आहे.  

या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात आटपाडी तालुक्‍यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानभरपाईसाठी सरकारने हेक्‍टरी आठ हजार आणि फळबागेसाठी हेक्‍टरी १८ हजार नुकसान भरपाईचा निर्णय जाहीर केला. त्याप्रमाणे तालुक्‍यात तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या तीन सदस्यीय समितीने नुकसानीचे पंचनामे केले. शेवटच्या टप्प्यात वेळ कमी राहिल्यामुळे अनेक गावांत गडबडीत आणि एका एकाने पंचनामे केले. पंचनाम्याच्या याद्या सरकारला पाठवल्या आणि कसानभरपाई मंजूर झाली. 

तालुक्‍यात कुरुंदवाडी येथील ४४ शेतकऱ्यांच्या झरे जिल्हा बॅंकेच्या शाखेत नुकसान भरपाई मंजूरपेक्षा ज्यादा पाठवल्या आहेत. शेतकऱ्याचे एकूण क्षेत्र, बाधित क्षेत्र आणि नुकसानीस पात्र झालेली रक्कम एक असताना प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बॅंकेतील खात्यावर ज्यादा पैसे पाठवले आहेत. एकट्या कुरुंदवाडीत अडीच लाख रुपयांवर ही रक्कम आहे. याशिवाय छोट्या-छोट्या गावात असा प्रकार घडला आहे. मंजूर रकमेपेक्षा जादा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केल्यामुळे गडबड उजेडात आली आहे. अनेक गावांतील शेतकरी अनुदानपासून वंचित आहेत.   

९ हजारांचे २८ हजार  

कुरुंदवाडी येथील एका शेतकऱ्याला नऊ हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली असताना जिल्हा बॅंकेच्या शाखेत त्याच्या खात्यावर २८ हजार रुपये जमा केले आहेत, असे अनेक शेतकऱ्यांबाबत झाले.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT