Don't increase the height of 'Almatti': Raju Shetty
Don't increase the height of 'Almatti': Raju Shetty 
मुख्य बातम्या

‘अलमट्टी’ची उंची वाढवू नका ः राजू शेट्टी

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्ह्यांच्या महापुरास कारणीभूत असणाऱ्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय रद्द करावा. कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यांवरील पुलाचा भराव कमी करून कमानी बांधकाम करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे रविवारी (ता. २६) केली. बेळगाव येथे त्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.

श्री. शेट्टी म्हणाले, की सीमाभागामध्ये महापुराने थैमान घातले असून महापुराची पाणीपातळी कमी होण्यास वेळ लागल्याने नागरी वस्तीत व शिवारात जास्त दिवस पाणी राहिल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २००५, २००६, २०१९ व २०२१ या महापुराचा विचार करता २०२१ च्या महापुरात कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्ह्यांतील महापुराची परिस्थिती बदलले असल्याचे जाणवून आले आहे.

कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी या नद्यांवर जे पूल बांधलेले आहेत. त्या अनेक पुलांच्या दोन्ही बाजूंस दोन -दोन किलोमीटर भराव आहे. महापूर काळामध्ये नद्या पात्रापासून दोन - दोन किलोमीटर पाणी पसरते अशा काळात हे पूल बंधाऱ्याचे काम करतात म्हणून नदीतील पाण्याची पातळी अत्यंत मंद गतीने कमी होते. महापुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑगस्टपर्यंत अलमट्टीची पाणीपातळी ५१२ मीटर ठेवावी. बेळगाव जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यांवरील पुलांचा भराव कमी करून दोन्ही बाजूंस दोन -दोन कमानी बांधकाम केल्यास पाण्याचा फुगवटा कमी होऊन पात्राबाहेर पडलेले पाणी सहजगत्या प्रवाहित होईल.

या वेळी मुख्यमंत्री बोम्मई यांनी महापुराच्या समस्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून पुलांचे भराव कमी करून कमानी उभारणी करून पाणी प्रवाहित केले जाईल. तसेच महापूर नियंत्रणासाठी अभ्यासगट नेमून त्याबाबत उपाययोजना करत असून, कर्नाटक सरकारकडून केंद्रीय जल आयोगाकडेही याबाबत पत्रव्यवहार केले असल्याची माहिती दिली. सदर अहवाल आल्यानंतर पुढील उपाययोजनांसाठी लवकरच मंत्रालयात बैठकीसाठी शेतकरी प्रतिनिधी म्हणून श्री. शेट्टी यांना या बैठकीसाठी निमंत्रित केले.

या वेळी कर्नाटक राज्य व केंद्र सरकारचे समन्वयक मंत्री शंकरगौंडा, खासदार अण्णासाहेब ज्वोले, आमदार संजय पाटील, आमदार कल्लाप्पाणा मग्यान्नावर, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर व बेळगाव जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT