orange producers
orange producers  
मुख्य बातम्या

आमच्यासाठी यंदाची विशेष दिवाळी

टीम अॅग्रोवन

अमरावती ः व्यापाऱ्यांच्या मुजोरीला आम्ही मोडीत काढले. आमचा माल आम्ही आमच्याच अटींवर विकणार असे ठणकावले आणि चमत्कार घडला. आमच्या ६० टक्‍के निकषांवर संत्रा खरेदीस व्यापारी तयार झाले. चौसाळा गावातील आम्हा शेतकऱ्यांसाठी त्यामुळेच यंदाची दिवाळी विशेष ठरली असून, हेच आमच्यासाठी लक्ष्मीपूजन ठरले आहे, अशा शब्दांत चौसाळा ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या. अंजनगावसुर्जी तालुक्‍यातील चौसाळा, भंडारज, निमखेड बाजार, चिंचोना, खिराळा, दहीगाव या सहा गावांमध्ये संत्रा खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी आपली नियमावली तयार केली होती. त्यामध्ये २० किलोऐवजी ३० किलो क्षमतेच्या मंडी क्रेटने खरेदी करणे, दलाली २ टक्‍के अशा शेतकऱ्यांसाठी अडचणींच्या अटींचा समावेश होता. क्रेटचा दर दिला जात असल्याने २० किलोऐवजी दहा किलो अधिक संत्रा फळ शेतकऱ्यांना द्यावी लागणार होती. त्यामुळे यात शेतकऱ्यांचे नुकसानच अधिक होणार होते. परिणामी, २२ गावांतील शेतकऱ्यांनी सामूहिकपणे याचा विरोध करण्याचा निर्णय घेतला. ग्रामसुरक्षा समितीची स्थापना त्यासाठी करण्यात आली. त्यासोबतच संत्रा विक्रीसाठी आपली नियमावली तयार करून त्याच अटी, शर्तींच्या आधारे संत्रा विकणार असल्याचे गावकऱ्यांनी व्यापाऱ्यांना ठणकावले.  शेतकऱ्यांच्या या संघटित क्रांतीचा अपेक्षित परिणाम झाला आणि चमत्कार घडला. शेतकऱ्यांच्या सहा अटी मान्य करीत व्यापाऱ्यांनी खरेदीची तयारी दर्शविली. त्यामध्ये २० किलो क्षमतेच्या क्रेटनेच खरेदी ही महत्त्वपूर्ण अट होती. व्यापाऱ्यांच्या मुजोरीविरोधात आवाज उठविऱ्या या शेतकऱ्यांची माहिती सर्वदूर पसरली. त्याच आधारे गुजरातेतील अहमदाबादच्या प्राइमफ्रेश कंपनीने या भागातून संत्रा खरेदीची तयारी दर्शविली. दिवाळीत कंपनीकडून खरेदी केली जाणार आहे. यामुळे स्पर्धा वाढल्याने दरातील तेजीदेखील संत्रा उत्पादक अनुभवत आहेत. त्यामुळेच आमच्यासाठी हेच लक्ष्मीपूजन ठरले, असेही गावकरी सांगतात.  शेतकरी संघटित झाले, सामूहिक लढा पुकारला त्यामुळेच हे शक्‍य झाले, अशी भावना या २२ गावांतील शेतकऱ्यांमध्ये रुजली आहे. यापुढील काळात संघटनात्मक आयुधाचा अशाच सकारात्मक कामासाठी वापर करण्यावर त्यांचे एकमत झाले आहे. गावातील काहींनी तर ही त्यांच्यासाठी दिवाळी भेटच ठरल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया गावकऱ्यांनी सामूहिकपणे व्यापाऱ्यांना विरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर व्यापाऱ्यांकडून देखील शेतकऱ्यांचे संघटन पाहता माघार घेण्यात आली. वीस किलो क्षमतेच्या टोमॅटो क्रेटनेच खरेदी आणि इतर सहा निकष मान्य करण्यात आले. त्यामुळे एका अर्थाने आमच्यासाठी लक्ष्मी प्रसन्न होत, हेच लक्ष्मीपूजन ठरले आहे. - हर्षद काळमेघ, ग्रामस्थ, चौसाळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT