District Milk Union wrote a letter to the animal feed companies
District Milk Union wrote a letter to the animal feed companies 
मुख्य बातम्या

औरंगाबाद जिल्हा दूध संघाने लिहिले पशुखाद्य कंपन्यांना पत्र 

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : ‘कोरोना’च्या संकटात मागणी व विक्री घटल्याने दुधाचे दर ५ ते ७ रुपयांनी घसरून दूध उत्पादक संकटात सापडला आहे. अशावेळी उत्पादकाला आधार म्हणून पशुखाद्य निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या पशुखाद्याचे दर कमी करण्याचा विचार करावा, अशी मागणी करणारे पत्र औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने पशुखाद्य निर्मिती कंपन्यांना गुरुवारी (ता. ९) पाठविले आहे. 

या संदर्भात अधिक माहिती देताना जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे म्हणाले, जिल्हा दूध संघाकडून आजच्या स्थितीत जवळपास ९० हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते. ‘कोरोना’च्या संकटापूर्वी जिल्हा दूध संघाकडे संकलित होणाऱ्या एकूण दुधापैकी जवळपास ४५ ते ५० हजार लीटर दूध विक्री केले जायचे. तर उर्वरित दुधापासून बाय प्रॉडक्ट बनविले जायचे. त्यामुळे दूध उत्पादकाला बऱ्यापैकी दर मिळत होते. परंतु ‘कोरोना’च्या संकटामुळे जिल्हा दूध संघाच्या दुधाची विक्री २८ ते २९ हजार लिटरवर आली. शिवाय दुधापासून तयार होणाऱ्या बाय प्रॉडक्टची विक्रीही शून्यावर आली. त्यामुळे दुधाचे खरेदी दर पाच ते सात रुपयांनी खाली आले आहेत. विविध पशुखाद्य तयार करणाऱ्या कंपन्यांकडून वाजवी दरात जवळपास दीडशे ते दोनशे टन पशुखाद्य खरेदी करून ते पशुखाद्य ना नफा ना तोटा तत्त्वावर जिल्हा दूध संघ जिल्ह्यातील ३५ ते ४० हजार दूध उत्पादकांना पुरविण्याचे काम करते.आजघडीला ते २६ रुपये प्रतिकिलोने कंपन्या पशुखाद्य पुरवितात. दूध उत्पादक आपल्याकडील दूध देणाऱ्या जनावराला पाच ते सहा किलो पशुखाद्य खाऊ घालतो. दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नातील जवळपास ७० टक्के उत्पन्न हे पशुखाद्य वर खर्च केले जाते. परंतु आता दुधाच्या घसरलेल्या खरेदी दरामुळे उत्पादकाला तोटा सहन करण्याची वेळ आली आहे. 

कंपन्यांना अभिप्राय कळविण्याची विनंती  जिल्हा सहकारी दूध संघ अंतर्गत मागणीनुसार पुरवठा होणाऱ्या पशुखाद्याचे दर कमी करण्याचा विचार करण्याची मागणी जिल्हा सहकारी दूध संघाकडून गोदरेज ॲग्रो टेक प्रायव्हेट लिमिटेड रुमी टेक प्रायव्हेट लिमिटेड व बारामती ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड यांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे. या पत्राच्या उत्तरादाखल आपला अभिप्राय कळविण्याची विनंतीही करण्यात आल्याचे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष श्री. काळे यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

SCROLL FOR NEXT