District Level Control Room for information on 'Corona'
District Level Control Room for information on 'Corona' 
मुख्य बातम्या

सोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी नियंत्रण कक्ष

टीम अॅग्रोवन

सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, हा नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू राहणार आहे. संजय गांधी योजनेचे तहसीलदार किरण जमदाडे (९८५०७६२०३४) यांच्या पर्यवेक्षणाखाली या कक्षाचे कामकाज २४x७ सुरू राहणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले.

सोलापूर जिल्हा आणि शहर परिसरात ‘कोरोना’ विषाणू संसर्ग याबाबत नागरिकांना काही अडचणी अथवा तक्रार नोंदविण्याची असेल, तर या नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२१७-२७३१०१२ असा आहे.

या कक्षात सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून तीन कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांनी आपले मोबाईल फोन बंद ठेवू नये, वेळेपूर्वी कामावर उपस्थित रहावे, असेही या आदेशात नमूद केले आहे. 

कर्मचारी आणि त्यांचा दूरध्वनी क्रमांक नियंत्रण कक्षातील कर्मचारी सकाळी सहा ते दुपारी दोन, दुपारी दोन ते रात्री दहा आणि पुन्हा रात्री दहा ते सकाळी सहा अशी तीन पाळीत हा नियंत्रण कक्ष सुरू राहील. या कक्षात ए. एम. शेख, वरिष्ठ लिपिक, (८८५५८३२८५४), आर. के. गुरव, वरिष्ठ सहायक (९८२२२०९२९३) पी. एस. बिराजदार, वरिष्ठ सहायक ( ९८९०६११६५६), एस. बी. पौळ, वरिष्ठ सहायक (९९६००९४३८९), डी. व्ही. राठोड, वरिष्ठ सहायक ( ९२८४२६३१३३) पी. के. देवळे, कनिष्ठ सहायक (८८८८४३०१२०) हे सहा कर्मचारी असतील. त्याशिवाय राजीव गाडेकर, कनिष्ठ लिपिक (९४२१०६०९४३), वि. या. आखाडे, कनिष्ठ लिपिक (९७६३९७५०३०) आणि  व्ही. सी. शेंडगे, कनिष्ठ लिपिक (८६२५९३१७१४) हे तीन राखीव कर्मचारीही या कक्षासाठी ठेवण्यात आले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT