Distribution of cucumber to three thousand policemen on duty
Distribution of cucumber to three thousand policemen on duty 
मुख्य बातम्या

कर्तव्यावर असलेल्या तीन हजार पोलिसांना काकडीचे वाटप  

टीम अॅग्रोवन

नाशिक : लॉकडाऊनचा सगळ्यात जास्त फटका शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला बसला आहे. लाखो रुपयांची निर्यातक्षम शेतमाल अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कष्टाने पिकविलेल्या हा शेतमाल असा फेकताना, सडताना पाहून अनेकांच्या पोटात धस्स होतं. पण अशाही परिस्थितीत निफाड तालुक्यातील शेतकरी शरद शिंदे यांनी तब्बल साडे आठशे किलो निर्यायतक्षम काकडी शेतातून काढून लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी दिवस रात्र रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या पोलिसांसाठी भेट म्हणून दिली आहे. 

शरीराला लाभदायी ठरणारी काकडी भर उन्हात मिळाल्याने पोलिसांनीही या शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत. शेतकऱ्याच्या संकल्पनेचे व औदार्याचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी देखील कौतुक केले आहे. निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील शरद शिंदे हे प्रयोगशील युवा शेतकरी आहेत. देशसेवा करणाऱ्या हातांना आपलेही बळ लाभो या विचाराने शिंदे यांनी सुमारे आठ क्विंटल काकडी शहरातील बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिस बांधवांना सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून वाटप केले आहे. 

लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी आपला शेतमाल नष्ट न करता, फेकून न देता तो लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनातर्फे चालवल्या जाणाऱ्या निवारागृह, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवकांच्या माध्यमातून जनहितासाठी दान करावा.  - शरद शिंदे, प्रयोगशील युवा शेतकरी, खडक माळेगाव, ता. निफाड   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT