Disinfection of vehicles in the Sangli Market Committee
Disinfection of vehicles in the Sangli Market Committee 
मुख्य बातम्या

सांगली बाजार समितीत वाहनांचे निर्जंतुकीकरण

टीम अॅग्रोवन

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विष्णू अण्णा फळे व भाजीपाला मार्केटमध्ये कांदा बटाटा आणि फळांचे सौदे सुरू झाले आहे.  ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या वतीने या ठिकाणी वाहन निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. 

विष्णू अण्णा फळे व भाजीपाला मार्केटमध्ये रोज मोठ्या प्रमाणावर भाजी, कांदा-बटाटा, फळांची आवक होते. यावेळी वाहने पर राज्यातून, पर जिल्ह्यांतून तसेच जिल्ह्याच्या विविध भागांतून येत असतात. तसेच व्यापारी आणि किरकोळ व्यापाऱ्यांचीही वर्दळ असते. त्यामुळे याठिकाणी दक्षतेसाठी महापालिकेच्या वतीने गुरूवारी (१६) या ठिकाणी मोठी कृत्रिम गुफा बसविण्यात आली आहे.

यामधून सर्व लोक आणि वाहनांना प्रवेश देण्यात येतो आहे. या गुफेत अत्याधुनिक फॉगर बसविण्यात आले आहेत. त्यातून वाहन आणि लोकांवर सॅनिटाझर फवारण्यात येतात. त्यामुळे निर्जंतूक होऊनच वाहन आणि लोकांचा प्रवेश बाजार समितीमध्ये होतो. याचा फायदा प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून होणार आहे. अत्याधुनिक फोगरचा वापर करून सॅनिटायझरच्या माध्यमातून हे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT