संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सोलापुरात द्राक्षावर डाऊनी; पण नियंत्रणात

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सातत्याने निर्माण होत असलेले ढगाळ हवामान आणि अधूनमधून पावसाची हजेरी, यामुळे आगाप छाटणी केलेल्या द्राक्षबागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव वाढतो आहे. जिल्ह्यात द्राक्षाचे एकूण क्षेत्र सुमारे २५ हजार एकरपर्यंत आहे. त्यापैकी १० ते २० टक्के क्षेत्राला त्याचा सर्वाधिक फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विशेषतः बार्शी, पंढरपूर, मोहोळ भागातील द्राक्षबागांवर हा प्रादुर्भाव दिसत आहे.

जिल्ह्यात फळबागांमध्ये डाळिंबानंतर द्राक्षाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. जानेवारी-फेब्रुवारी हा द्राक्षाचा सर्वसाधारण हंगाम असतो. त्यासाठीची छाटणी ही १५ ते २५ ऑक्‍टोबरदरम्यान घेतली जाते. पण, या छाटणीचे सगळे गणित पावसावर अवलंबून असते. सहसा २० ऑक्‍टोबर हीच योग्य वेळ समजून छाटणी केली जाते. गेल्या दोन वर्षांपासून कमी होत असलेला पाऊस आणि त्याचे दिवस यामुळे बहुतांश छाटणी ऑक्‍टोबरमध्येच वेळेवर होते आहे.

यंदाही तशीच स्थिती होती. पण पंढरपूर, बार्शी आणि मोहोळच्या काही भागांत काही शेतकऱ्यांनी आधीच बऱ्यापैकी पाऊस झाल्याने आणि मुख्य हंगामाच्या अगोदर जास्त दर मिळेल, या अपेक्षेने सप्टेंबरमध्ये आगाप छाटणी केली. आता त्याच बागांवर ढगाळ हवामान आणि पावसामुळे डाऊनीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अर्थात, हे क्षेत्र कमी असले, तरी त्याचे नुकसान अधिक आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून तर सातत्याने ढगाळ वातावरण होत असल्याने आर्द्रतेचे प्रमाण वाढते आहे, परिणामी डाऊनीला पोषक वातावरण तयार होत आहे. त्यातही नवीन फुटलेल्या पानावर त्याचा प्रादुर्भाव जास्त दिसतो आहे. पण एकूण क्षेत्रापैकी १० ते २० टक्के क्षेत्राला त्याची झळ सोसावी लागत असल्याचे सांगण्यात आले. सध्या द्राक्ष उत्पादक आपापल्या परीने त्यावर उपाय करत असले तरी, डाऊनी कितपत नियंत्रणात येईल, हे हवामानावरच अवलंबून असेल.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT