milk
milk  
मुख्य बातम्या

दूध भेसळीची चर्चा डेअरी उद्योगावर संकट आणणारा 

टीम अॅग्रोवन

पुणे ः शेतकऱ्यांच्या दुधाला कमी भाव मिळत असल्याची कारणे वेगवेगळी आहेत. मात्र ५० लाख लिटर दूध भेसळीचे असल्याने दर देता येत नसल्याचा मुद्दा कपोलकल्पित आहे. भेसळीच्या या चर्चेमुळे राज्याच्या डेअरी उद्योगावर संकट येऊ शकते, असा इशारा महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया उद्योजक कल्याणकारी संघाने दिला आहे. 

दुधाच्या भेसळीबाबत संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पवार, कोशाध्यक्ष डॉ. विवेक क्षीरसागर भूमिका मांडली. ‘‘राज्यात सध्या ११९ लाख लिटर दूध येते आहे. त्यात ५० लाख लिटर दुधात भेसळ असल्याची चर्चा अकारण घडवून आणली जात आहे. यामुळे डेअरी उद्योगाची बदनामी होत असून त्याचा फटका पुन्हा दूध उत्पादक शेतकऱ्यांनाच बसेल,’’ असेही संघाने स्पष्ट केले आहे.  मुलापेक्षाही ब्रॅंडला जपतो ः कुतवळ  ‘‘प्रत्येक डेअरीकडून स्वतःच्या मुलांपेक्षाही आपल्या ब्रॅंडची काळजी घेतली जात आहे. हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत दूध व्यावसायिक गैरकृत्यात सहभागी असतील. मात्र अशा व्यावसायिकांना चाप लावण्याचे काम अन्न व औषध प्रशासन करीत आहे. सर्वच दूध व्यावसायिक शासनाच्या मदतीने शेतकऱ्यांना दर देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र भेसळीची चर्चा उगाच उकरून काढली जाते. त्यामुळेच गेल्या दहा वर्षांत ५० टक्के दूध परराज्यांतील ब्रॅंडच्या हातात गेले आहे,’’ असे संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांचे म्हणणे आहे. 

शेतकरी भरपूर कष्ट घेतात ः चितळे  चितळे उद्योग समूहाचे संचालक श्रीपाद चितळे यांनी सांगितले, की भेसळीचा मुद्दा गौण आहे. तो उकरून काढल्यास ग्राहकांकडून दूध घेणे कमी होऊ शकते. त्यातून दर कमी होऊन, शेवटी शेतकऱ्यांना फटका बसेल. दूध वाढीवर सर्वांत चांगला उपाय शेतकऱ्याचे दूध उत्पादन वाढविणे व त्यासाठी सुधारित लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रा पुरवणे हाच आहे. या नव्या तंत्राच्या वापरामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल व आणखी गुणवत्तापूर्ण दूध मिळेल. सध्याच्या व्यवस्थेत दूध उत्पादनासाठी शेतकऱ्यांकडून भरपूर कष्ट घेतले जातात. मात्र त्यांना सुधारित मात्रा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. सुदैवाने राज्यात सरकारने तशी सुरुवात देखील केली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT