Direct sales of vegetables, fruit farmers to consumers
Direct sales of vegetables, fruit farmers to consumers 
मुख्य बातम्या

बुलडाणा : भाजीपाला, फळांची शेतकरी ते ग्राहक थेटविक्री

टीम अॅग्रोवन

बुलडाणा ः सद्यःस्थितीत ग्राहकांना ताजा भाजीपाला व फळे मिळावीत यासाठी शेतकरी ते ग्राहक अशी विक्री व्यवस्था उभी करण्यात मेहकर तालुक्यात कृषी यंत्रणेला यश आले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक नरेंद्र नाईक यांच्या संकल्पनेतून नियोजन करीत कलिंगड, द्राक्ष व भाजीपाल्याची गटांमार्फत विक्री सुरू केली आहे. 

कृषी सहायक व कृषी मित्रांच्या मदतीने गावागावांतील भाजीपाला, फळे याबाबत उत्पादक शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात आली. यामधून तालुक्यात ७२ हेक्टर वांगी, ३० हेक्टर टोमॅटो, ६ हेक्टर काकडी, ३० हेक्टर भेंडी, ५२ हेक्टर मिरची, १३६ हेक्टर कांदा, ४० हेक्टर पालेभाज्या व ६५ हेक्टर इतर असे ४७३ हेक्टर भाजीपाला व संत्रा, कलिंगड, खरबूज, पपई, द्राक्ष या पिकांची लागवड झाल्याचे समोर आले. 

सध्या यातील बहुतांश माल काढणीला आलेला असल्याने व विक्रीला अडचण झाल्याने सकाळी आठ ते १२ या वेळेत विक्री सुरू करण्यात आली. या पद्धतीतून सरस्वती (ता. लोणार) येथील अनिल दूधमोगरे हे दररोज तीन क्विंटल द्राक्ष, उद्धव देशमुख (आंध्रूड) हे दररोज चार टन कलिंगड, विजय चांगाडे गटाच्या माध्यमातून दोन टन कांदा विकत आहेत. 

यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी नारायण देशमुख, तालुका कृषी अधिकारी सतेंद्र चिंतलवाड यांच्या मार्गदर्शनात कृषी सहायक विठ्ठल धांडे, विलास काळे, समाधान कंकाळ, आदी पुढाकार घेत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT