मुंबई : विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.२७) गौरव करण्यात आला.
मुंबई : विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.२७) गौरव करण्यात आला. 
मुख्य बातम्या

कृषी औद्योगिक क्षेत्रात वळसे पाटलांचे कार्य उल्लेखनीय

टीम अॅग्रोवन

मुंबई : राजकारणातील दुसऱ्या पिढीला नेतृत्व देताना थेट कॅबिनेट मंत्री करून जबाबदारी दिली. या पिढीने जबाबदारी समर्थपणे पेलून यशस्वी केली, यात दिलीप वळसे पाटील यांचे योगदान ठळकपणे दिसते. वळसे पाटलांचे कृषी आद्योगिक उभारणीसह ऊर्जा आणि शिक्षण क्षेत्रातील कामाने राज्याच्या विकासाला दिशा दिली, असे गौरवौद्‌गार माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले. रवींद्र नाट्य मंदिर येथे दिलीप वळसे पाटील एकसष्टी गौरव समारंभ आणि गौरव ग्रंथ प्रकाशन कार्यक्रम सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता.२७) पार पडला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते आदी मान्यवर उपस्थित होते.  श्री. पवार म्हणाले, की दिलीप वळसे पाटलांचे वडील दत्तू पाटील आणि मी ५० वर्षांपूर्वी एकत्रच विधानसभेत आलो. सत्तेतून विरोधात गेल्यानंतर भामरागड ते सांवतवाडी असा राज्यव्यापी प्रवास केला. दिलीपच्या राजकीय प्रवेशानंतर त्यांनी मागास प्रदेशात विकासाची गंगा नेली. नव्या नेतृत्वाची फळीला मी थेट कॅबिनेट मंत्री केलं. राजकारणात संधी महत्त्वाची असते, महाराष्ट्राच्या विकासासाठी नव्या पिढीने संधी सार्थ ठरविली त्यामध्ये वळसे पाटलांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की राजकारणात सदहृदयी व्यक्ती, कुशल प्रशासक, प्रामाणिकपणा वळसे पाटलांच्या ठायी ठायी दिसतो. दूरगामी परिणाम लक्षात घेऊन ऊर्जामंत्री असताना त्यांनी भारनियमन उपाययोजना केली. राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील कामाचे श्रेय वळसे पाटलांना जाते. विधानसभा अध्यक्षपदावरून सरकारला मार्गदर्शक नेतृत्व ठरल्याचे त्यांनी नमूद केले. अशोक चव्हाण, रामदास आठवले, दिवाकर रावते यांचीही या वेळी भाषणे झाले. वळसे पाटील यांच्यावरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. सत्काराला उत्तर देताना वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्या आशीर्वादाने जीवन घडल्याचे सांगितले. राजकीय संधी १९८८ मधे मिळाली. ऊर्जामंत्री, अर्थमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. सर्वांचे प्रेम मिळाले. कोठेवाडी आणि माळीण दुर्घटना या कारकिर्दीतील मोठी आव्हानं असल्याचे त्यांनी नमूद केले.

दिलीप वळसे पाटलांनी नेतृत्वामध्ये नेहमी विश्वास ठेवला. आयुष्यभरात तडजोड केली नाही. अनेकजण आयुष्यभर विरोधात काम केल्यावर सत्तेतही विरोधी पक्षासारखे काम करतात. वळसे पाटील मात्र यामध्ये योग्य समन्वय ठेवतात. अडचणीत  मदत केलेल्यांना मी नेहमी लक्षात ठेवतो. दिल्लीत सहकाराबद्दल निराशा असून धोरणाची गरज आहे. साखरधंदा अडचणीत असून त्याचे नेतृत्व दिल्लीत सक्षमपणे झाले पाहिजे. राज्यातील सिंचनही ४० टक्क्यांवर नेणार असल्याचे गडकरी म्हणाले. १०० टक्के इथेनाॅल वापरून तयार मोटारसायकल टेस्ट झाली आहे. विदर्भात मदर डेअरीच्या मदतीने दूधधंदा वाढतोय. राजकारण समाजकारण आणि विकासाचा वारशाची महाराष्ट्राची परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT