सर्व्हर डाउनमुळे डिजिटल सातबारा कोमात
सर्व्हर डाउनमुळे डिजिटल सातबारा कोमात 
मुख्य बातम्या

सर्व्हर डाउनमुळे डिजिटल सातबारा कोमात

टीम अॅग्रोवन
  सोलापूर : राज्यभरातील खातेदारांना १ ऑगस्टपासून ऑनलाइन डिजिटल सातबारा मिळेल, असे सरकारने महिन्यापूर्वी जाहीर केले. परंतु, सर्व्हर डाऊन असल्याने अडीच महिन्यात जिल्ह्यातील १० लाख ७३ हजार ४५ उताऱ्यांपैकी फक्‍त १ लाख ७१ हजार सातबारा डिजिटल झाले आहेत.
खातेदारांच्या वेळेची व पैशांची बचत व्हावी आणि त्यांना वारंवार सातबारासाठी हेलपाटे मारायला लागू नये, या उद्देशाने डिजिटल स्वाक्षरीचा उतारा उपलब्ध करून देण्याचे सरकारने स्पष्ट केले. मात्र, मागील दोन महिन्यांपासून त्याला अद्यापही मूर्त स्वरूप आलेले नाही. सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने खरेदी-विक्रीनंतरच्या नोंदी प्रलंबित राहिल्या आहेत.
जिल्ह्यातील मोहोळ, दक्षिण व उत्तर सोलापूर आणि सांगोला सोडून अन्य तालुक्‍यांमध्ये ऑनलाइन ई-फेरफारचे काम सुरू असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु, त्याठिकाणीही सर्व्हर डाऊनचाच अडथळा येत आहे. करमाळा, मोहोळ, माळशिरस वगळता अन्य तालुक्‍यांमध्ये २० टक्‍केसुद्धा काम झालेले नाही. उत्तर सोलापूर, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्‍यांत १० टक्‍क्‍यांहून कमी काम झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT