मका
मका 
मुख्य बातम्या

मका खरेदी केंद्राची मुदत वाढवावी

टीम अॅग्रोवन

नगर ः राज्यामध्ये हमीदराने मका खरेदी करण्यासाठी शासनाने खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत. त्याची मुदत रविवारी (ता. ३१) संपत असल्याने ते खरेदी केंद्रे बंद करण्यात येणार आहेत. मात्र शेतकऱ्यांकडे अजून मोठ्या प्रमाणात मका शिल्लक आहे. त्यामुळे मका खरेदी केंद्राला मुदवाढ मिळावी, अशी मागणी शेतकरी नेते धनंजय धोर्डे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.  मुख्यमंत्री सोमवारी (ता. १) शनिशिंगणापूर येथे आले होते. त्या वेळी धोर्डे यांनी त्यांना निवदेन दिले. त्यात म्हटले आहे, की राज्यामध्ये अनेक ठिकाणी हमीदराने मक्‍याची खरेदी करण्यासाठी खरेदीकेंद्रे सुरू आहेत. त्याची मुदत ३१ डिसेंबरला संपली. मात्र बहुतांश ठिकाणी मक्‍याचे खळे करण्याचे काम नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंतही चालते. खळे केल्यावर साधारण आठ ते दहा दिवस मका वाळण्याला लागतात. अनेक ठिकाणी अजूनही मका काढणे बाकी आहे. त्यामुळे ही खरेदी केंद्रे सुुरू राहणे गरजेचे आहे. त्यामुळे सुरू असलेल्या मका खरेदी केंद्राला मुदतवाढ देऊन मका साठवणीसाठी गोदाम उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी धोर्डे यांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT