धनंजय मुंडे
धनंजय मुंडे 
मुख्य बातम्या

कापसाला ४८५० रुपये हमीभाव द्या ः धनंजय मुंडे

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्य सरकारने सध्या राज्यात सुरू केलेल्या कापूस खरेदीत शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राज्यात कापसाला ४३२० रुपये अधिक ५०० रुपये बोनस असा गुजरातच्या धर्तीवर प्रतिक्विंटल ४८५० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्यात नुकतीच १२१ केंद्रांवर हमीभावाने कापूस खरेदीची घोषणा राज्य सरकारने केली असून, त्या पार्श्वभूमीवर श्री. मुंडे यांनी ही मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभावाइतका भाव मिळत नाही. त्यामुळे मध्य प्रदेशच्या धर्तीवर हमीभावातील फरकाची रक्कम नुकसानभरपाई म्हणून दिली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. हमीभाव न देणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यासंबंधीचा कायदा करण्याची घोषणा करून सरकारने कारवाई केलेली नाही. यासंबंधी हिवाळी आधिवेशनात अशासकीय विधेयक आणून सरकारला कायदा करण्यास भाग पाडू, असा इशारा श्री. मुंडे यांनी दिला आहे. राज्य सरकारकडून कापूस हमीभावाने खरेदीसाठी सीसीआय आणि महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक व पणन महासंघ यांची १२१ कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी कापूस पणन महासंघाद्वारे ६० केंद्रे व केंद्र शासनाच्या नोडल एजंट सीसीआयद्वारे ६१ अशा १२१ केंद्रांवर हमी दरावर कापूस खरेदी करण्यास सुरवात झाली आहे. ‍मागील तीन दिवसांपासून महासंघाद्वारे ३९ कापूस खरेदी केंद्रांवर आणि उर्वरित २१ केंद्रांवर कालपासून कापूस खरेदीला सुरवात झाल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT