जामसंडे, जि. सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील बहुतांशी झाडांवर आता छोटी फळे अशा अवस्थेत आहेत.
जामसंडे, जि. सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील बहुतांशी झाडांवर आता छोटी फळे अशा अवस्थेत आहेत.  
मुख्य बातम्या

देवगडचा हापूस महिनाभर उशिराने बाजारात येणार

Raj Chougule

सिंधुदुर्ग : ओखी वादळाचा फटका आता देवगडच्या प्रसिद्ध हापूसला बसत आहे. हंगामात सर्वांत आधी (अर्ली) बाजारात येण्याची ख्याती असलेला देवगडचा हापूस आंबा यंदा बाजारात वादळामुळे चक्क महिनाभर उशिरा येणार आहे. परिणामी सुरवातीच्या मिळणाऱ्या दराचा फायदा यंदा उत्पादकांना होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. सध्या देवगड तालुक्यातील बहुतांशी हापूस आंब्याच्या बागा आता फळधारणेच्या अवस्थेत आहेत. यामुळे अपवाद वगळता हंगाम मार्चमध्येच सुरू होण्याची शक्यता असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे.

पहिल्या टप्प्यातील मोहोरावर परिणाम आंब्याला ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंत तीन टप्प्यांत मोहोर येताे. पहिला मोहोर ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये, दुसरा डिसेंबर, जानेवारीमध्ये, तर तिसरा मोहोर फेब्रुवारीत येतो. ऑक्टोबरमध्ये जो मोहोर येतो तो आंबा साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात बाजारात येतो. हा आंबा बाजारात येण्यासाठी देवगड भागातील बागायतदारांची ख्याती आहे. लवकर आंबा आल्याने याला हंगामापेक्षा जवळ जवळ दुप्पट दर मिळतो. यंदा हवामान चांगले असल्याने नोव्हेंबरमध्ये मोहोर चांगला आला; पण अचानक वादळ झाल्याने थंडी कमी झाली, त्यातच कोकण किनारपट्टीवर पाऊस सुरू झाल्याने नोव्हेंबरमध्ये आलेल्या मोहोराचे अस्तित्वच संपुष्टात आले. या मोहोराचे नुकसान झाल्याने फळे लागण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही.

डिसेंबरचे हवामान अनुकूल वादळानंतर डिसेंबरमध्ये मात्र हळूहळू थंडी वाढत गेली, त्याचा सकारात्मक परिणाम आंबा बागांवर झाला. ती फळे आता वाढीच्या अवस्थेत आहेत; पण ही फळे येण्यास मार्चचा मध्यच उजाडणार असल्याने यंदा फेब्रुवारीत देवगड हापूसचा आस्वाद मिळण्याची शक्यता कमी असल्याचे देवगड तालुक्यातील चित्र आहे

२५ टक्क्यांनी फटका बसणार? गेल्या वर्षी हापूसचे उत्पादन उच्चांकी (बंपर क्रॉप) होते. केवळ देवगड तालुक्यातच ५० ते ६० हजार हेक्टर आंब्याचे क्षेत्र आहे. गेल्या वर्षी अनुकूल हवामान असल्याने देवगड हापूसचे उत्पादन चांगले झाले. बहुतांशी झाडांना एक वर्षाआड मोहोर येत असल्याने यंदा काहीसे उत्पादन घटण्याची शक्यता बागायतदारांची आहे. यातच अर्ली आंब्याचे उत्पादन होणार नसल्याने तो उत्पादन घटीचा तोटा ही गृहीत धरता एकूणच यंदा आंब्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ज्या वेळी वादळ झाले त्याच वेळी यंदा आमचा अर्ली हंगामातील आंबा बाजारपेठेत न जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे येत्या महिन्याच्या कालावधीत आंबा बाजारात येण्याची फारशी शक्यता नाही. दुसरा मोहोर चांगला आल्याने मार्चमध्येच पूर्ण वेगात हंगाम सुरू होण्याची दाट शक्यता आहे - ॲड. अजित गोगटे , अध्यक्ष, देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT