Developed an online form for Corona's information collection
Developed an online form for Corona's information collection 
मुख्य बातम्या

कोरोनाच्या माहिती संकलनासाठी ऑनलाईन फॉर्म विकसित

टीम अॅग्रोवन

सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनातर्फे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. प्रशासनातर्फे कोरोना ‘विषाणू’च्या बाबत माहिती संकलन करण्यासाठी तीन ऑनलाईन फॉर्म बनविले आहेत. माहिती तंत्रज्ञान कक्षाचे (महा-आयटी) प्रकल्प अधिकारी रिझवान मुल्ला यांनी हे फॉर्म विकसित केले आहेत. याबाबत माहिती भरण्यासाठी काही शंका असल्यास श्री. मुल्ला यांना ९९७५८९२७९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

या ऑनलाईन फार्मची आणि त्याच्या वेबलिंकची माहिती खालीलप्रमाणे :- १.https://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLSeEici३ZKKgSGYcIRiVgMLrqxDfHWvOjbKcHEsN५२XU०_w४१A/viewform अथवा https://bit.ly/३dDRstB या लिंकवर दिसणाऱ्या फॉर्ममध्ये पुणे, मुंबई वा मागील पंधरा दिवसांत परदेशातून आलेल्या प्रवाशांनी माहिती स्वत: भरावयाची आहे. इतर नागरीक सुद्धा असे काहीप्रवासी आपल्या गावामध्ये आले असतील, तर अशी माहिती देऊ शकतील. 

ही माहिती प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागामार्फत सदरील व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय यांची काळजी घेण्‍यात येईल. व्यक्तीला माहिती द्यायची असेल तर त्या व्यक्तीचे कुटुंब प्रमुखाने नाव व संपर्क क्रमांक कळवावा, ही माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. प्रवाशी आजारी असल्यास नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेत उपचार घेणेचे आहे अथवा जिल्हा ‘कोरोना’ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. (जिल्हा कोरोना कक्ष नियंत्रण क्रमांक . ०२१७-२७३१०२०)

मदत करू इच्छिणाऱ्या  स्वयंसेवी संस्थांनाही आवाहन ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत शहरातील व जिल्ह्यातील कमकुवत व गरीब नागिरकांना तसेच वाहतूक बंद असले कारणामुळे इतर जिल्ह्यातून चालत आलेल्या मजूर इत्यादी यांनी आपल्या जिल्ह्यात आसरा घेतला आहे. अशा लोकांना शिधा, जेवण पुरवू इच्छिणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील सेवाभावी व बिगर सरकारी संस्थासाठीचा फॉर्म लिंक आहे. त्यावर स्वयंसेवी संस्थानी माहिती भरावी.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

Agriculture Drone : ‘वनामकृवि’मध्ये कृषी ड्रोन तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम

Cotton Cultivation : आठ राज्यांत अतिसघन कापूस लागवड प्रकल्प

Cotton Market : परभणी, हिंगोलीत कापसाची १२.७० लाख क्विंटल खरेदी

SCROLL FOR NEXT