In Deola Bazar Samiti Rules announced
In Deola Bazar Samiti Rules announced 
मुख्य बातम्या

देवळा बाजार समितीत नियमावली जाहीर

टीम अॅग्रोवन

देवळा : ‘‘देवळा शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतमाल खरेदी, विक्रीसाठी येणाऱ्या घटकांनी नियमावलीचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’’ असा इशारा सभापती केदा आहेर यांनी दिला.

देवळा बाजार समितीमध्ये कार्यक्षेत्रातील अने शेतकरी शेतमाल विक्रीसाठी येतात. त्यामुळे गर्दी होऊन सामाजिक अंतर राखले जात नाही. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीने संलग्न सर्व घटकांसाठी  नियमावली जाहीर केली आहे.  बाजार समितीचे आवारात प्रत्येक व्यक्तीने तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे अनिवार्य केले आहे.

आवारात धूम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही विना मास्क बाजार आवारात येऊ नये. सर्दी, ताप, खोकला असलेल्या तसेच आजारी व्यक्तीने समितीत प्रवेश करू नये. तसे आढळून आल्यास तत्काळ आरोग्य विभागास कळविण्यात येईल. वाहन पार्किंग केल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला कळविण्यात  येईल. 

शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आदल्या दिवशी बाजार समितीत मुक्कामी येऊ नये. ज्या दिवशी लिलाव असेल, त्या दिवशी सकाळनंतर आवारात यावे. बाजार समितीत आल्यानंतर वाहनामध्ये किमान ३ ते ५ फूट अंतर सोडावे. 

वाहनाजवळच थांबावे, ज्या वाहनाचा लिलाव सुरु असेल, त्या शेतकऱ्यानेच वाहनाजवळ थांबावे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती केदा आहेर यांनी केले. उपसभापती संजय चंदन, सचिव माणिक निकम उपस्थित होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

Crop Damage : गारपीट, वादळी पाऊस होऊनही पीक नुकसान नसल्याचा अहवाल

Veterinary : पशुचिकित्सा पुनर्रचनेविरोधात पदविकाधारकांनी थोपटले दंड

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

SCROLL FOR NEXT