sugar
sugar  
मुख्य बातम्या

लॉकडाऊननंतरही साखरेला कमी उठाव राहणार 

Raj Chougule

कोल्हापूर: ऐन उन्हाळ्यातच शीतपेयांसह साखरेचा अधिक वापर करणारे उद्योग बंद राहिल्याने साखरेची विक्री ठप्प झाली आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत लॉक डाऊन निघाला तरी साखर वापर करणारे उद्योग धीम्या गतीनेच सुरु होण्याची शक्‍यता आहे. मे महिन्यात आवश्‍यक ती साखर उद्योगाकडून खरेदी होइल की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. लॉकडाऊन पंधरा दिवस जरी वाढला तरी याचा विपरीत परिणाम साखरेची मागणी व वापरावर होण्याचे स्पष्ट संकेत उद्योगातील सूत्रांनी दिले.  पेय, शीतपेय आणि आइस्क्रीम उत्पादकासह मिठाई बनविणारे संस्थात्मक खरेदीदार उन्हाळाच्या प्रारंभी साखरेची मागणी नोंदवतात. तब्बल ६५ ते ७० टक्के मागणी या व्यावसायिकांकडून असते. यंदाही या हालचाली सुरु असताना ऐन उन्हाळ्याच्या प्रारंभीच लॉकडाऊनचे संकट आले. कंपन्या अधिक मागणी गृहीत धरुन उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करीत असतानाच उद्योग अचानक बंद पडले. देशातील आघाडीच्या कंपन्यांनाही याचा फटका बसला. याचा परिणाम साखर उद्योगावर झाला. सध्या फक्त घरगुती वापरासाठीच मागणी आहे. ती पण अत्यल्प आहे.  एप्रिलमध्ये पन्नास टक्केही विक्री नाही  मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत २१ लाख साखरेची विक्री कारखान्यांनी केली होती. मार्चच्या उत्तरार्धात लॉकडाऊन सुरु झाल्याने मार्च महिन्यातील साखरेची विक्री झाली नाही. एप्रिलमध्ये १८ लाख टन साखर विक्रीचे उद्दिष्ट केंद्राकडून आलेले होते. याच्या पन्नास टक्केही विक्री कारखान्यांकडून झाली नाही. एप्रिल महिन्यात साखर विक्री ठप्प झाल्यासारखीच स्थिती आहे. मागणी, वाहतूक बंदचा जबरदस्त फटका कारखान्यांना बसला  शिल्लक साखरेचा दबाव शक्‍य  यंदा साखरेचे उत्पादन घटले असले तरी पुढील वर्षी साखरेच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदा न विकली गेलेली साखर पुढील हंगामासाठी डोकेदुखी बनू शकते, असा अंदाज साखर उद्योगाचा आहे. शिल्लक राहिलेल्या साखरेचा दबाव पुढील हंगामावर नक्कीच विपरीत परिणाम करेल, अशी भिती एका कारखानदार सूत्रांनी व्यक्त केली. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा २० लाख टनापर्यंत साखरेचा वापर कमी होण्याची शक्‍यता साखर उद्योगातून व्यक्त करण्यात येत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT