भुदरगडमधील मध व्यवसायाला चालना देण्याची मागणी
भुदरगडमधील मध व्यवसायाला चालना देण्याची मागणी 
मुख्य बातम्या

भुदरगडमधील मध व्यवसायाला चालना देण्याची मागणी

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर  : भुदरगड तालुक्‍यातील पाटगाव परिसरातील मध व्यवसायाला खादी ग्रामोद्योग मंडळाकडून चालना मिळावी, अशी मागणी मध उत्पादक शेतकऱ्यांनी केली. 

शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने या भागातील मध उत्पादनात सातत्याने घट होत आहे. येथील मधुमक्षिका पालन व्यवसाय धोक्‍यात आहे. मधमाशी पालनात काही अडचणी आहेत. खरीप व रब्बी हंगाम वगळता अन्य हंगामांत त्यांना पुरेसे खाद्य मिळत नाही. विषारी कीटकनाशकांचा अती वापर व जंगली प्राण्याकडून मधमाश्‍यांच्या पेट्या फोडणे आदी मधमाशा पालनासाठी हानिकारक ठरत आहे.

 पाटगाव परिसरात शेतीला जोड व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालन केले जाते. सुमारे दहा ते बारा हजार किलो मध गोळा केला जातो. मागील पंधरा ते वीस वर्षांपूर्वी सुमारे वीस हजार किलो मधाचे संकलन होत होते; परंतु काही वर्षांपासून मधमाशीवर पडलेल्या थॅयोब्रुक सॅड नावाच्या रोगामुळे या भागातील उत्पादनात घट झाली. बाजारपेठेतील मधाच्या वाढत्या मागणीमुळे येथील उत्पादकांनी कृषी खात्यामार्फत अनुदान घेऊन हा व्यवसाय सुरू केला. आज कोल्हापूरसह राज्यात पाटगावच्या मधाला चांगली मागणी आहे. 

वेगवेगळ्या हंगामांत मधमाश्‍या मध गोळा करतात. त्यानुसार मधाला नावे देण्यात आली. यामध्ये जांभळीच्या मधाला सर्वांत जास्त मागणी आहे. तो सुमारे एक हजार रुपये किलो भावाने विकला जातो. या मधाचा वापर हृदयविकार, मधुमेह, कॅन्सरसारख्या रोगांवर इलाज करण्यासाठी होतो.  मध उत्पादकांना प्रशिक्षण मिळत नसल्याने मधुमक्षिका पालन करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. मधमाशापालनातून एक एकर शेतातील पेट्यातून वर्षाकाठी ५० ते ९० हजार रुपयांचा मध जमा होतो. याकरिता खादी ग्रामोद्योग मंडळाने मधमाश्‍यांच्या व्यवसायाला गती द्यावी अशी मागणी  आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT