Demand for funds for the Ambeohal project
Demand for funds for the Ambeohal project 
मुख्य बातम्या

आंबेओहळ प्रकल्पासाठी निधीची मागणी 

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : उत्तूरसह परिसरातील जवळपास २२हून अधिक गावांना वरदायिनी ठरणाऱ्या आंबेओहळ प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा व त्याअंतर्गत पुनर्वसनाचा प्रश्न पूर्णपणे सुटावा यासाठी शाहू कारखान्याचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी निधीची मागणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हंटले आहे की, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या सहकार्यातून व कोल्हापूरचे माजी मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यातून या प्रकल्पासाठी विशेष तरतूद करून या प्रकल्पासाठी २२७ कोटी रुपयांचे पॅकेज (प्रकल्प खर्च व पुनर्वसन यांच्यासह) मंजूर केले होते. त्याप्रमाणे काम ही युद्धपातळीवर चालू झाले होते. परंतु सद्यःस्थितीस प्रकल्पाचे काम रेंगाळले असून पुनर्वसनासाठीचा प्रश्न अद्याप पूर्ण मिटलेला नाही. काहींना पुनवर्सनाच्या बदल्यात सरकाने मंजूर केलेली रक्कम मिळाली आहे. तर काहींना अद्याप मिळालेली नाही. यासाठी अपुऱ्या निधीचे कारण पुढे करण्यात येत आहे. 

या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी रखडलेल्या प्रकल्पास शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करावा व उर्वरित शेतकऱ्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यानुसार घाटगे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच निधीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांची पुनर्वसनाचे काम पूर्ण झाल्यास हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येणार असून त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे. या प्रकल्पाच्या कामाची पाहणी श्री. घाटगे यांनी प्रत्यक्ष केली. यावेळी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता बारदेस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT