‘भोजापूर’मधून फुलेनगर, दुशिंगपूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी 
मुख्य बातम्या

‘भोजापूर’मधून फुलेनगर, दुशिंगपूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी

टीम अॅग्रोवन

सिन्नर, जि. नाशिक : पूर्व भागात दुष्काळाची भयानक स्थिती आहे. तरीही भोजापूर धरणातून फुलेनगर व दुशिंगपूर बंधाऱ्यामध्ये पाणी सोडले जात नाही. भोजापूर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत या परिसराचा विचार न करताच अधिकारी-लोकप्रतिनिधींनी पिण्यासह शेतीच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला पूर्वभागातील ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवला. या बंधाऱ्यांमध्ये पाणी न सोडल्यास भोजापूर कालव्यात उपोषणाला बसण्याचा इशारा, तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत वावी परिसरातील शेतकऱ्यांनी दिला.

भोजापूरच्या पाण्यासह दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांचा चारा, निळवंडे कालवा प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पूर्व भागातील शेतकऱ्यांनी सिन्नर-शिर्डी मार्गावर वावी येथे आठवडाभरापूर्वी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. त्या वेळी तहसीलदार नितीन गवळी यांनी सर्व प्रश्नांसंदर्भात बैठक घेऊन तोडगा काढण्याची ग्वाही दिली. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. २६) तहसीलदारांच्या दालनात पूर्व भागातील शेतकऱ्यांची बैठक झाली.

दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या पिण्यासाठी फुलेनगर, दुशिंगपूरचे बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा विचार न करता आवर्तन सोडण्याचा निर्णय कसा घेण्यात आला, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. या बंधाऱ्यासाठी पाण्याचे आरक्षण नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दीड-दोन तास त्यावर चर्चा झाली. शेवटी गवळी यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत पाण्याच्या आरक्षणाबाबातचा स्वतंत्र प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचा शब्द दिला. त्यानंतर बैठक आटोपली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT