नाशिक जिल्ह्यातील टँकरच्या संख्येत घट
नाशिक जिल्ह्यातील टँकरच्या संख्येत घट 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यातील टँकरच्या संख्येत घट

टीम अॅग्रोवन

नाशिक : जुलैच्या सुरवातीला जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पावसाचे आगमन झाले. तर काही भागांत पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. तरी जिल्हाभर म्हणावा तसा समाधानकारक पाऊस झालेला नाही. तरी झालेल्या पावसाचा आधार झाला असून, गुरुवार (ता. ११) अखेरीस टँकरच्या संख्येत घट झाल्याचे चित्र आहे. गत महिन्यात २५ जूनअखेर सर्वाधिक १२७८ गावे वाड्यांसाठी ३९७ टँकर सुरू होते. त्यात घट झाली असून, सध्या ९०१ गावे - वाड्यांची तहान टँकरवरच अवलंबून आहे. परिणामी, जिल्ह्यात २७९ टँकर सुरू आहेत. त्यामध्ये येवला तालुक्यात सर्वाधिक ६१ टँकर अजूनही सुरू आहेत. दुष्काळाने चालू वर्षी नागरिकांचे चांगलेच हाल झाले. त्यात जनावरे सांभाळताना अनेकांना कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी पाण्याचे स्रोत आटल्याने बहुतांश तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. त्यात पावसाचे उशिरा आगमन झाल्याने अडचणी वाढल्या होत्या. मात्र नाशिक, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, दिंडोरी, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांना या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. तर येवला, नांदगाव, मालेगाव, बागलाण, सिन्नर, चांदवड, मालेगाव आदी तालुक्यांमध्ये पावसाने आवश्यक हजेरी लावलेली नाही. परिणामी, तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. दरम्यान, आदिवासी पट्ट्यात टँकर बंद झाले असून, नांदगाव तालुक्यातील टँकरची संख्या निम्म्यावर आल्याने आशादायी चित्र निर्माण झाले आहे. 

तुलनात्मक टँकरची स्थिती

तालुका जून (२५ जून अखेर) जुलै (११ जुलै अखेर)
बागलाण ३९ ३९
चांदवड २३ १४
दिंडोरी
देवळा १९ १९
इगतपुरी १३
कळवण
मालेगाव ५७ ४८
नांदगाव ८३ ४२
नाशिक
निफाड    
पेठ
सुरगाणा
सिन्नर ७० ५५
त्र्यंबकेश्‍वर
येवला ६५ ६१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT