‘कृष्णे’च्या पाणीपातळीत घट
‘कृष्णे’च्या पाणीपातळीत घट 
मुख्य बातम्या

‘कृष्णे’च्या पाणीपातळीत घट

टीम अॅग्रोवन

सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला पाणीपुरवठा होणाऱ्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील पंपगृहात मागील आठवड्याच्या तुलनेत सहा फूट पाणीपातळी घटली आहे. परिणामी, योजनेच्या व्यवस्थापन विभागाने पहिल्या टप्प्यातील चालू पंपाची संख्या २४ वरून १५ इतकी केली आहे. 

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची मागणी वीस दिवसांत जवळपास शंभर पंप या विक्रमी नोंदीसह सुरू आहे. यामुळे दुष्काळी भागातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत मिळाली आहे. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणीपातळीत घट होण्यास सुरवात झाली आहे. याचा परिणाम या योजनेवर होत आहे. योजनेचा पहिला टप्पा म्हैसाळ येथे आहे. या ठिकाणी असणारी पाणीपातळी अतिशय कमी आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात दोन दिवसांपूर्वी ६२७ इतकी होती. ती ६२० फूट इतकी झाली आहे.

उपसा करणारे पंप नाइलाजाने कमी करावे लागत आहेत. पहिल्या टप्प्यात २४ पंपापैकी १५ पंप सुरू ठेवणेच शक्य आहे. त्यामुळे ९ पंप बंद करण्यात आले आहेत.  त्याचा परिमाण उर्वरित टप्प्यातील पंपावर होणार आहे. जतमधील तीन उपसा सिंचन योजनेतील सर्व पंप बंद होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, सध्या कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यातून योजना सुरू आहे. पण, त्याच पाण्यावर म्हैसाळ, टेंभू आणि ताकारी योजनाही पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे कोयनेतील विसर्ग तीन योजनांसाठी कमी पडला आहे. त्यामुळे पंप बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला असल्याची माहिती सूत्रांंनी दिली.  ही योजना पंधरा जूनपर्यंत सुरू ठेवण्याचा विचार आहे. सध्या कोयनेतून पाणी कमी आल्याने हे संकट आले आहे. परंतु, कोयना धरणात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुरेल इतके पाणी आहे. 

वारणातून विसर्ग सुरू सध्या वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  त्यामुळे हे पाणी म्हैसाळ योजनेच्या पहिल्या टप्प्यापर्यंत येण्यास दोन दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. त्यानंतर बंद केलेले पंप सुरू करण्यात येतील.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT