संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कर्जमाफीसंबंधीच्या याद्यांचा गोंधळ वाढला

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः जिल्ह्यात कर्जमाफीसंबंधीच्या याद्या बॅंकांमध्ये उपलब्ध नाहीत. बॅंकांनी मात्र आपल्याला कर्जमाफीचा लाभ मिळाला नसेल, तर संपर्क साधण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. शेतकरी याद्या पाहण्यासाठी गेले, तर त्यांना कुठलेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे चित्र आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्याची अंतिम ३१ मार्चची मुदत जवळ येत आहे, तरीही हा गोंधळ कायम असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

कर्जमाफीच्या प्रक्रियेत सावळा गोंधळ सुरूच असल्याने शेतकऱ्यांना हकनाक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्हा बॅंकेकडून २५ टक्के सवलतीसंबंधीचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळू शकलेला नाही. या संदर्भात शेतकरी बॅंकेत विचारणा करायला गेल्यास त्यांना आम्ही माहिती अपलोड केली आहे. शासनच निर्णय घेईल, याद्या शासनच पाठवित आहे, असे सांगितले जाते. परंतु जी माहिती बॅंकेने अपलोड केली आहे, त्याची कुठलीही यादी किंवा माहिती शेतकऱ्यांना दिली जात नाही.

त्यामुळे आपले नाव सवलतीच्या किंवा कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट आहे, की नाही याचा उलगडाच शेतकऱ्यांना होत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा बॅंकेच्या तालुका किंवा ग्रामीण शाखांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्येही असाच प्रकार सुरू आहे.

कर्ज भरावे कसे? दीड लाखावर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आपले नाव कर्जमाफीच्या यादीत आहे की नाही, याचा उलगडा झालेला नाही. ३१ मार्चपर्यंत दीड लाखावरील कर्ज भरून आपले थकीत खाते एनपीएतून (नॉन परफॉर्मिंग ऍसेट) बाहेर काढण्याचे निर्देश आहेत. परंतु कर्जमाफीच्या यादीत आपले नावच नसल्याने शेतकरी दीड लाखावरील कर्जही भरू शकत नसल्याची स्थिती आहे.

४० दिवसांपासून नवी यादीच नाही जिल्हा बॅंकेला शासनाकडून ४० दिवसांपूर्वी २५ टक्के सवलत व कर्जमाफी यासंबंधीच्या याद्या प्राप्त झाल्या होत्या. त्यात ज्या त्रुटी होत्या, त्यांची नावे बॅंकेने शासनाकडे पुन्हा पाठविली. संबंधित दुरुस्त झालेली यादी व नवी यादी अद्यापही जिल्हा बॅंकेला प्राप्त झालेली नाही. सोसायट्यांचे सचिव जागेवर राहत नाहीत.  त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत.

३१ मार्चपर्यंत दीड लाखावरील कर्ज भरायचे निर्देश शासनाने कर्जमाफी योजनेसंबंधी दिले आहेत. परंतु अजून दीड लाखावरील थकबाकीदार शेतकऱ्यांना आपले नाव कर्जमाफीच्या यादीत आहे की नाही, याचाच उलगडा झालेला नाही. नव्या याद्या सोसायटीत आलेल्या नाहीत. - प्रदीप पाटील, शेतकरी, करंज, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT