संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

‘लाव रे तो व्हिडिओ’ला भाजपकडून  ‘बघाच तो व्हिडिओ’ ने प्रत्युत्तर

टीम अॅग्रोवन

मुंबई  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपकडून त्यांच्याच स्टाईलमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून शनिवारी (ता. २७) प्रत्युत्तर देण्यात आले. मनसेच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ला भाजपकडून ‘बघाच तो व्हिडिओ’च्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात आले. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर प्रचारसभांचा धडाका लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक आरोप केले. मोदी यांची जुनी भाषणे, जाहिरातींचे व्हिडिओ दाखवून भाजपच्या दाव्यांची पोलखोल केली. या सर्व टीकेला भाजपने वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहामध्ये ‘बघाच तो व्हिडिओ’ च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले.राज ठाकरे यापूर्वी राहुल गांधी, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्याबद्दल काय बोलले होते. त्यांच्यावर कशी टीका केली होती. ते राज ठाकरे यांचे जुने व्हिडिओ या वेळी दाखविण्यात आले.

राज ठाकरे यांच्या ३२ प्रकरणांचा आढावा घेण्याची आमची तयारी आहे, पण वेळेअभावी १९ प्रकरणे दाखवणार असल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी या वेळी सांगितले. असत्य आणि अर्धवट गोष्टींवर राजकारण करण्याची राज ठाकरे यांची प्रवृत्ती आहे. ‘खोटं बोल, पण रेटून बोल म्हणजे राज ठाकरे’ अशी टीकाही श्री. शेलार यांनी केली. राज ठाकरे यांनी केलेले आरोप कसे अर्धवट, अर्धसत्यावर आधारित आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखविण्यात आले. आशिष शेलार यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्या दाव्यांची पोलखोल केली.

राज ठाकरे यांनी या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. आपल्या प्रचारसभांमधून ते भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे आवाहन करत आहेत. तोच धागा पकडून आशिष शेलार यांनी ‘मित्रा तू खरंच चुकलास` असे भावनिक उद्गारही या वेळी काढले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT