मंगळवेढा तालुक्यात  कोंबड्यांचा मृत्यू Death of hens in Mangalvedha taluka
मंगळवेढा तालुक्यात  कोंबड्यांचा मृत्यू Death of hens in Mangalvedha taluka 
मुख्य बातम्या

मंगळवेढा तालुक्यात  कोंबड्यांचा मृत्यू

टीम अॅग्रोवन

सोलापूर : मारापूर (ता. मंगळवेढा) येथील १२ कोंबड्या अचानक मृत्युमुखी पडल्या आहेत. मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवल्या आहेत. त्या बाबतचा अहवाल चार दिवसांमध्ये येणार आहे. त्यानंतर नेमक्या त्या कशामुळे दगावल्या, हे समजेल असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. जंगलगीतील बर्ड फ्लूच्या घटनेनंतर इथेही त्याचीच शक्यता व्यक्त होत आहे. 

मारापूर येथील रामचंद्र गोविंद यादव यांच्या घरासमोर असणाऱ्या खुराड्यातील १२ कोंबड्या दगावल्या. यादव यांनी प्रशासनाला त्या बाबतची माहिती दिली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तातडीने तिथे भेट देऊन मृत कोंबड्याचे नमुने घेऊन पुण्याला प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.

जंगलगी येथील कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याने तेथील ७५० कोंबड्या आणि ११० अंडी प्रशासनाने नष्ट केली होती. तसेच परिसरातील घरोघरी जाऊन कोंबड्यांचा शोध सुरू ठेवला आहे.

मारापूर येथील कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने त्या परिसरातील पशू-पक्षीपालक चिंतेत आहेत. दरम्यान, त्या परिसरात दहा किलोमीटर भागात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच या भागात कोंबड्यांची खरेदी-विक्री, वाहतूक यासर्वांवर निर्बंध आणल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT