grapes export
grapes export  
मुख्य बातम्या

निर्यातक्षम द्राक्षनोंदणीला मुदतवाढ

टीम अॅग्रोवन

नाशिक : युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरिता ''अपेडा''च्या ‘ग्रेपनेट'' प्रणालीअंतर्गत नोंदणी करण्यात येते. यानुसार नोंदणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित द्राक्षबागांची शेतकरी व कृषी विभागाला नोंदणी वेळेवर करण्यात आली नाही. त्यामुळे नोंदणीची मुदत ३० डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाच्या संचालकांनी नोंदणी अधिकारी, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पत्रकाद्वारे कळविले आहे.  जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीसाठी अपेडाच्या ''ग्रेपनेट'' या संगणकीय प्रणालीवर द्राक्ष पिकाची क्षेत्रासह ऑनलाइन नोंदणी करावी करावी लागते. २०१८-१९ च्या हंगामात ३८ हजार प्लॉटची नोंदणी झाली होती. गेल्या चार वर्षांतील हा उच्चांक होता. यंदा ९ डिसेंबर अखेर २० हजार ९३६ बागांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे हा आकडा अपेक्षेपेक्षा कमी आहे.  पुन्हा एकदा द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरिता तालुकास्तरावरून खास मोहीम राबवून बागांची नोंदणीची कार्यवाही पूर्ण करावी, तसेच नोंदणीकृत द्राक्ष बागायतदार व क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी जिल्हा व तालुका स्तरावर राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे, असे कळविण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT