Damage to houses due to rain in Warhad
Damage to houses due to rain in Warhad  
मुख्य बातम्या

वऱ्हाडात पावसाने पिकांसह घरांचे नुकसान

टीम अॅग्रोवन

अकोला : वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी पुन्हा एकदा पावसाने पिकांची दाणादाण उडविली. मंगळवारी (ता.३१) झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे गहू, हरभरा, कांदा, लिंबू, भाजीपाला, संत्रा पिकांचे नुकसान झाले.  

अकोला जिल्हयात पातूर, बार्शीटाकळी, बुलडाणा जिल्‍ह्यात चिखली, खामगाव, मेहकर या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी पूर्व मोसमी पावसाने जोरदार हजेरी दिली. मंगळवारी दुपारी चार वाजेनंतर वादळी वाऱ्यासह पातूर तालुक्यातील चान्नी परिसरात गारपीट झाले. यात शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. तासभर आलेल्या पावसाने लिंबू, सीताफळ, पेरू फळबागांच्या नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. 

पातूर तालुक्यातील सायवणी, सुकळी परिसरात मोठ्या प्रमाणात गार पडली. तसेच विवरा, चरणगाव मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला त्यामुळे परिसरातील कलिंगड, खरबूज, लिंबू, पपई, भाजीपालावर्गीय पिके व तसेच कांदा पीक भुईसपाट झाले.

लागोपाठ दुसऱ्या दिवशी झालेल्या गारपिटीने तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. तर सायवणी येथे संजय ताले यांच्या शेतामधील कांद्याचे नुकसान झाले. याच तालुक्यात सुकळी, खेट्री, चतारी, चांगेफळ, शिरपूर, सावरगाव, उमरा, पांगरा आदी ठिकाणीही नुकसान झाले. 

बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे या वादळाचा शेतांमधील पिकांना फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे पडली. तर घरावरील टीनपत्र्ये उडाल्याने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. पिंजर परिसरात भाजीपाला, लिंबू, संत्रा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पातूर तालुक्यातील विवरा परिसरात गारपीट झाली. मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यांसह पावसामुळे विविध शेती पिके भूईसपाट झाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT