Damage to crops by stormy windे
Damage to crops by stormy windे 
मुख्य बातम्या

कायगावात वादळी वाऱ्याने पिके भुईसपाट

टीम अॅग्रोवन

कायगाव, जि. औरंगाबाद : वादळी पावसाने शेतकऱ्यांची अवकाळा होत आहे. पावसात अमळनेर शेतवस्तीवरील सुधाकर हुसाळे यांच्या राहत्या झोपडीवजा घराचे छप्पर वादळी वाऱ्याने उडून गेले. तर चंपानंद साळवे यांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. त्यामळे त्यांना रात्र थंडी गारठ्यात पावसात भिजून काढावी लागली. त्यात अन्नधान्य भिजल्याने चूल बंद झाली.

अगोदरच ‘कोरोना’च्या भितीमुळे घरदार न सोडल्यामुळे शेतमजूर लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात गुढी पाडव्याच्या सणासुदीच्या दिवशी अचानक आलेल्या पावसाने अनेकांची अवकळा केली. कायगाव (ता. गंगापूर) परिसरात बुधवारी (ता. २५) रात्री सातच्या सुमारास विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काढणीस आलेला गहू, कांदा, ज्वारी, हरभरा आदी पिके भिजून मोठे नुकसान झाले आहेत. 

कायगाव, अमळनेर, लखमापूर, गणेशवाडी, गलनिंब, भिवधानोरा, अगरवाडगाव, पखोरा, जामगाव, ममदापूर, बगडी, अगरकानगाव, भेंडाळा या भागात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अखेर सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह मध्यम ते हलक्या स्वरूपाचा एक ते दीड तास पाऊस झाला. त्यामुळे काढणी आलेला गहू, कांदा, हरभरा, ज्वारी भिजून शेतमालाचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे मोठमोठी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी वीज तारा, खांब तुटून पडले. त्यामुळे रात्रभर वीज पुरवठा खंडीत झाला होता.

फळ पिकांना मोठा फटका बसला आंब्याचा मोहोर देखील गळून पडला आहे.  वाऱ्याने चिकू, पपई, मोसंबी, लिंबू झाडाखाली पडून प्रचंड नुकसान झाले आहे. गुरुवारी (ता. २६) दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पुन्हा पाऊस येईल या भितीने शेतकऱ्यांनी शेतात काढणी केलेला कांदा ताडपत्रीने झाकून ठेवण्यासाठी धावपळ केली. आधीच ‘कोरोना’च्या भीतीने सर्व जण दहशतीच्या छायेत आहेत. त्यात अवकाळी पावसाने चांगलेच नुकसान केले आहे. एकंदरीत ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले असून लोक मेटाकुटीला आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT