Damage to 33,000 hectares of crops in Sangli
Damage to 33,000 hectares of crops in Sangli 
मुख्य बातम्या

सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन

सांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २०२ गावांतील ३५ हजार २१७ हून अधिक शेतकऱ्यांच्या ३३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या महापुराच्या पाण्यात ऊस उभारलेला आहे. तर अन्य पिके बुडाली आहेत. कृषी विभागाच्या नजर अंदाजानुसार हे क्षेत्र २३ हजार ५३९ हेक्टर आहे. त्यात सर्वाधिक ऊस १३ हजार ७२२ हेक्टर, भुईमूग ५ हजार ३१६, फळपिके पावणेतीन हजार हेक्टरचा समावेश आहे. २०१९ मध्ये ५३ हजार हेक्टरचे नुकसान झाले होते.

पुराने सर्वाधिक उसाचे १३ हजार ७२२ हेक्टरवरील नुकसान झाले आहे. त्यानंतर भुईमूग ५ हजार ३१६ हेक्टर, विविध फळपिके २ हजार ७१७ हेक्टर, सोयाबीन ५५८ हेक्टर, इतर ५८२ हेक्टर, द्राक्ष ७० हेक्टर, ज्वारी- २८ हेक्टर, भाजीपाला ३१० हेक्टर, कडधान्य ६० हेक्टर, फूल पिकांच्या ५० हेक्टरचा समावेश आहे.

जिल्ह्यात २०१९ मध्ये आलेल्या महापुरापेक्षा यंदा शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात भाजीपाला पाण्याने कुजला. त्यामुळे दररोज येणारा पैसा थांबला. परिणामी आर्थिक फटका बसला आहे. आता प्रतीक्षा आहे ती नुकसान भरपाईची. वास्तविक पाहता २०१९ ला शेतीचे पंचनामे झाले. भरपाई देखील मिळाली. मात्र, अनेक शेतकरी गतवर्षीच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे यंदाच्या पुराने नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे होतील. पण नुकसान भरपाई तातडीने मिळावी. पूर बाधित शेतकऱ्यांना गतवर्षी प्रमाणे प्रतीक्षा करावी लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे 

विमाधारक शेतकऱ्यांनी माहिती द्यावी जिल्ह्यात ‘रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पीकविमा काढलेला असल्यास नुकसानभरपाईसाठी ७२ तासांत विमा कंपनीस माहिती देणे बंधनकारक आहे. त्यासाठी क्रॉप इंशुरन्स ॲप, टोल फ्री क्रमांक - १८००१०२४०८८ यावर संपर्क साधावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

SCROLL FOR NEXT