Dam for wet drought in Nanded district, Rasta Roko
Dam for wet drought in Nanded district, Rasta Roko 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात ओल्या दुष्काळासाठी धरणे, रास्ता रोको

टीम अॅग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपासह बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी जिल्ह्यात सरकार विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय पक्षाकडून धरणे आंदोलन, रास्ता रोको करण्यात येत आहेत.

जिल्ह्यात जूनमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे सोयाबीनची दुबार, तिबार पेरणी करावी लागली. यानंतर सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे हाताशी आलेले पीक वाया गेले. यानंतर ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसामुळे यात भर पडून नुकसानीचे क्षेत्र साडेचार लाखांवर पोचले. विमा कंपनीकडून नुकसानीची माहिती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, शेतकऱ्यांना माहिती पाठविण्याचे काम करता येत नसल्याने तीही माहिती कंपनीकडे गेली नाही.

भाजपासह वंचित बहुजन आघाडी व सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडूनही शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. सामाजिक संघटनेमध्ये संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, प्रहार संघटनेकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे 

चालू हंगामात अतिवृष्टीने सर्व पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे शासनाने पंचनामे बंद करून ओला दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, पीकविमा मंजूर करावा आदी मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडकडून मंगळवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, जिल्हाध्यक्ष श्याम पाटील, जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे, जिल्हाध्यक्ष भगवान कदम, गजानन इंगोले, दत्ता येवले, राम अन्नकाडे, व्यंकटराव पाटील, सुनील धुमाळ, अंकुश कोल्हे, दशरथ डरंगे, बालाजी देशमुख, जेजेराव शिंदे, प्रभाकर ढगे यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT