The dam constructed by the Marathwadi dam victims
The dam constructed by the Marathwadi dam victims 
मुख्य बातम्या

मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे बांधकाम

टीम अॅग्रोवन

ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा आणि आमचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावूनच इकडे फिरका, असे प्रशासनाला ठणकावून सांगत बुधवारी (ता. २६) मराठवाडी धरणग्रस्तांनी धरणस्थळी सत्याग्रह करत धरणाचे बांधकाम बंद पाडले. 

पुनर्वसन कायद्याचे उल्लंघन करत मराठवाडी धरणाचे बांधकाम पुढे रेटले जात असल्याचा आरोप करत जनजागर प्रतिष्ठानने आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी मेंढ, उमरकांचन, जाधववाडी, मराठवाडी, जिंती येथील धरणग्रस्त महिला व पुरुष धरणस्थळी दाखल झाले. प्रतिष्ठानचे येथील मुख्य समन्वयक जितेंद्र पाटील, पुनर्वसन प्राधिकरण समितीचे विभागीय सदस्य जगन्नाथ विभूते यांनी धरणग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न आणि त्यासाठी केलेला पाठपुरावा याबाबत धरणग्रस्तांना माहिती दिली. 

शासकीय यंत्रणेकडून येत असलेले वाईट अनुभवही त्यांनी सांगितले. पुनर्वसन, भूखंड व जमीन वाटप, मंजूर रोख रकमेचे वाटप, नागरी सुविधा, शेतीला पाणीपुरवठा आदींशी संबंधित सुमारे ११ मागण्या प्रलंबित असल्याचे सांगत जोपर्यंत त्यावर निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी विलास जाधव, उमेश शिंदे, तानाजी सावंत, आनंदराव मोहिते, पांडुरंग पाटील, अर्चना पाटील, छबुताई मोहिते आदींसह विविध गावचे धरणग्रस्त महिला व पुरुष उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT