Free cowshed method
Free cowshed method 
मुख्य बातम्या

दुग्ध व्यवसायाने घराला आधार

Abhijeet Dake

शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला व्यवसाय आहे. अल्पभूधारक ते दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या दावणीला हमखास दुधाळ जनावरे बघायला मिळतील. यामुळे पशुपालकांना दहा दिवसाला पैसा देणारा आणि हमीचा व्यवसाय बनला आहे. या दुग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती केलीच त्याचबरोबर सधनता आली. सांगली जिल्ह्यात गायी, म्हशी मिळून सुमारे ६ लाख ६७ हजार ६३५ हून अधिक जनावरे आहेत. दररोज सुमारे १५ लाख दुधाचे संकलन होते. जिल्ह्यात दुधाची क्रांती झाली आहे. जिल्ह्यात सहकारी १७ तर खासगी ७ दूध संघ आहेत. सांगली जिल्ह्यात अलीकडच्या काळात गायी म्हशी संगोपनाचे प्रमाण प्रमाण वाढले आहे. परिणामी दूध उत्पादनही वाढले आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरित गाई, देशी दुधाळ गाई आणि दुधाळ म्हशी संगोपन केले जाते. दुग्ध व्यवसायात गेल्या काही वर्षापासून बदल झाले आहेत. हा प्रमुख व्यवसाय झाला आहे. अनेक युवा शेतकरी गायी, म्हशींचे मुक्तसंचार पद्धतीने संगोपन करत आहेत. यामुळे निश्‍चितपणे पशुपालन हा शाश्‍वत व्यवसाय बनला आहे. वास्तविक पाहता अल्पभूधारकापासून चार ते पाच एकर शेती असणारे शेतकरी पशुपालनाकडे वळला आहे. ग्रामीण भागातील तरुणांना पशुपालन हा चांगला व्यवसाय ठरला आहे. मुळात दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, तासगाव आणि खानापूर तालुक्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाकडे दोन चार जनावरे दावणीला बांधलेलीच असतात. पशुपालन आणि दूध विक्रीतून कुटुंबाला आर्थिक हातभार लागला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झाला. परिणामी सर्वबाजूंनी येणारा पैसा थांबला. या काळात दुग्ध व्यवसायाने कुटुंबाला चांगला आर्थिक दिला. देशी गायींना महत्व देशी गायी आपली बलस्थाने ठरू शकतात. देशी गायींच्या दुधाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. शेण आणि गोमूत्राचा वापर शेतीमध्ये फायदेशीर ठरतो. शेतकऱ्यांनी अतिशय काटेकोर पद्धतीने दुग्ध व्यवसाय उभा केला आहे. तसे पाहिलं तर हा व्यवसाय बारमाही आहे. फक्त जनावरांची योग्य काळजी घ्यावी लागते. या उद्योगाला स्थिरता देण्याचे काम शेतकऱ्यांनीच केले आहे. दुग्ध व्यवसायावर अनेक उद्योग सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात हा व्यवसाय प्रामुख्याने महिला सांभाळतात. शेतकऱ्यांना यातून चांगले अर्थार्जन होत आहे. - अजितराव घोरपडे माजी मंत्री, महाराष्ट्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT