dadaji bhuse
dadaji bhuse  
मुख्य बातम्या

कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना महिनाअखेर सातवा वेतन आयोग ?

टीम अॅग्रोवन

राहुरी विद्यापीठ, जि. नगर: महात्मा फुले कृषी विद्यापीठासह राज्यातील सर्व कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाने आग्रही भूमिका घेतली असून, याबाबतचे निवेदन व माहिती राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांना दिली. मंत्री भुसे यांनीही तातडीने लक्ष घालून महिनाअखेरपर्यंत विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होईल, अशी माहिती दिली.  या वेळी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर, मार्गदर्शक मच्छिंद्र बेल्हेकर, सचिव मच्छिंद्र बाचकर उपस्थित होते. राज्य शासकीय कर्मचारी व अकृषी विद्यापीठ सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे या कृषी विद्यापीठातील सातव्या वेतन आयोगासोबतच कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना तसेच सुधारित सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना अद्याप लागू झालेली नाही, त्यामुळे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT