संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

अंबाजोगाईत ११ ऑक्टोबरला सीताफळ महोत्सव

Santosh Munde

औरंगाबाद  : मराठवाड्यातील अंबाजोगाईस्थीत सीताफळ संशोधन केंद्रात येत्या बुधवारी (ता. ११) सीताफळ महोत्सवासह शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व सीताफळ संशोधन केंद्र, अंबाजोगाई यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या भागातील वाणांचा प्रदर्शनात सहभाग नोंदविण्याची संधीही सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना असणार आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे १९९७ साली पहिल्यांदा सीताफळ संशोधन केंद्राला मंजुरी मिळाल्यानंतर ते संशोधन केंद्र २००० साली कार्यान्वित झाले.

या केंद्राच्या माध्यमातून कार्यान्विततेच्या जवळपास सतरा वर्षांत पहिल्यांदाच अशाप्रकारे महोत्सव व शेतकरी मेळाव्याच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला गेला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत उत्पादित होणाऱ्या व आपली गुणवैशिष्ट्ये जपून असलेल्या सीताफळाच्या वाणांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. 

प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या सीताफळ वाणांची निकोप स्पर्धा ठेवून त्यांना पारितोषिकाने सन्मानितही करण्यात येणार आहे. या महोत्सवानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सीताफळाची आधुनिक पद्धतीने लागवड, उत्पादन तंत्रज्ञान, मार्केटिंग व प्रक्रिया उद्योग आदी विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपले विशेषत्व जपून असलेले सीताफळाचे वाण प्रदर्शनात सहभागी होणे अपेक्षित आहे. त्या वाणांच्या गुणात्मक संशोधनात मोठा हातभार लागेल, असे सीताफळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. गोविंद मुंडे म्हणाले.

औरंगाबादेतही सीताफळ महोत्सव औरंगाबाद शहरातही येत्या १३ ते १५ ऑक्‍टोबरदरम्यान सीताफळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद शहरातील कलाग्राममध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

मराठवाड्यातील सीताफळाची लागवड वाढावी, सीताफळाच्या प्रक्रियेत नवउद्योजकांनी उतरावे, तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोचावे, या उद्देशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, कृषी विभाग औरंगाबाद विभागीय आयुक्‍तालयाच्या समन्वयातून या सीताफळ महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.या संदर्भात नुकतीच बैठक पार पडल्याची माहिती हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT