Cultivation of strawberries at Derla in Loha
Cultivation of strawberries at Derla in Loha 
मुख्य बातम्या

लोह्यातील डेरला येथे स्ट्रॉबेरीची लागवड

टीम अॅग्रोवन

नांदेड : स्ट्रॉबेरीचे उत्पादन घ्यायचं म्हटलं तर महाबळेश्वर या भागाची आठवण येते. परंतु, लोहा तालुक्यातील डेरला येथील अर्जुन जाधव यांनी सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरीचे पीक फुलवले आहे. त्या मालाची पहिली तोडणी व विक्रीचा प्रारंभ बुधवारी (ता. १६) करण्यात आला. फळांची विक्री लिंबगाव रोडवरील विठोबा नैसर्गिक भाजीपाला व शेतमाल विक्री केंद्राद्वारे करण्यात येत आहे.

जाधव यांनी स्ट्रॉबेरीची विंटर डाऊन ही जात निवडली. दहा गुंठे क्षेत्रावर लागवड केलेल्या स्ट्रॉबेरीची रोपे वाई पाचगणी येथील रोपवाटिकेतून मागविण्यात आली. यासाठी प्रति रोपांचा खर्च बारा रुपये, तर वाहतुकीस दोन रुपये असे एकूण १४ रुपये प्रति रोप खर्च आला.

स्ट्रॉबेरीची लागवड चार फूट अंतरावर गादीवाफे तयार करून केली. त्यावर ठिबकसह प्लॅस्टिक मल्चिंग केले. एक फूट अंतरावर एकूण सहा हजार रोपांची लागवड केली. लागवड करण्यापूर्वी पिकाला शेणखत, गांडूळ खत, लिंबोळी पेंड यासह जैविक बुरशीनाशकांचा वापर केला. 

पहिला तोडा अडीच किलोचा मिळाला. येत्या काळात यात वाढ होऊन चांगल्या उत्पादनास सुरवात होईल व नांदेडकरांना सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेली सेंद्रिय स्ट्रॉबेरी मिळेल, असे अर्जुन जाधव यांनी सांगितले.

या पिकापासून चांगले उत्पादन मिळण्याची आशा असल्याने येत्या काळात यात वाढ करून दीड ते दोन एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.  सेंद्रिय पद्धतीमुळे पिकावर चांगली चमक गडद लाल रंग येऊन चवही चांगली आली आहे. त्यामुळे ग्राहकांकडून मागणी होत आहे. या पिकाची पनेट पॅकिंग करून ५० ग्रॅम पासून एक किलो वजन पर्यंतचे पॅकिंग तयार करण्यात येणार आहेत. आज या पिकाचे  शंभर ग्रॅम प्रमाणे २५ पनेट पॅकेट तयार केले आहेत. 

विविध प्रयोगातून स्ट्रॉबेरीची लागवड करण्याची प्रेरणा मिळाली. आगामी काळात स्ट्रॉबेरीची लागवड वाढवणार आहे.

- अर्जुन जाधव, शेतकरी, डेरला, ता. लोहा.

नांदेड जिल्ह्यात स्ट्रॉबेरी या फळाची सेंद्रिय पद्धतीने लागवड जाधव यांनी केली आहे. या फळपिकाचे स्वास्थ्यासाठी चांगले उपयोग आहेत. नांदेडकरांना ताजी स्ट्रॉबेरी मिळेल. - रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT