The culmination of the discussion
The culmination of the discussion 
मुख्य बातम्या

युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा परिषदेत घमासान

टीम अॅग्रोवन

अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र टंचाई निर्माण झाली असून हा मुद्दा मंगळवारी (ता. चार) झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत गाजला. सदस्यांनी या मुद्यावर आक्रमक होत, जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात युरियाचा पुरवठा झालेला असतानाही टंचाई कशी निर्माण झाली आहे, याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली. 

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक मंगळवारी (ता. ४) अध्यक्षा प्रतिभा भोजने होत्या. यावेळी उपाध्यक्षा सावित्री राठोड, सभापती पंजाबराव वडाळ, चंद्रशेखर पांडे, आकाश सिरसाट, मनिषा बोर्डे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, डाॅ. सुभाष पवार, कृषी विकास अधिकारी डाॅ. मुरली इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

बैठकीत सर्व पक्षीय सदस्यांनी युरीयाच्या मुद्यावर घमासान चर्चा केली. जिल्ह्यात वितरित झालेल्या युरियाची साठेबाजी झाल्याने टंचाई निर्माण झाल्याचे सांगितले. कृषी विभागाने एकाच ट्रेडर्सला 1600 बॅग युरियाचे वितरण कसे केले, असा प्रश्न उपस्थित केला. सदस्यांची मागणी व आक्रमकता पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी कटीयार यांनी या प्रकरणी साठ्याची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. 

जिल्ह्यात युरिया खत शेतकऱ्यांना मिळत नसल्याने सर्वत्र ओरड होत आहे. अकोला जिल्ह्याला इतर जिल्हयांच्या तुलनेत युरियाचा अधिक पुरवठा झालेला असतानाही खत का मिळत नाही, असा प्रश्न सदस्यांनी विचारला.  याअनुषंगाने अधिकाऱ्यांनी तक्रार आल्यास कारवाई करू, असे सांगताच गटनेते ज्ञानेश्वर सुलताने यांनी नाराजी व्यक्त केली. 

जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने यांनीही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथांची जाणीव ठेवून काम केले पाहिजे, असा सल्ला दिला. या चर्चेत सदस्य गजानन पुंडकर, शिवसेना गटनेते गोपाल दातकर यांनीही सहभाग घेतला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT