Crops in Marathwada were damaged due to heavy rains
Crops in Marathwada were damaged due to heavy rains 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पिके खरडली

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. मंगळवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दमदार पाऊस झाला; तर, जालना, बीड, उस्मानाबाद, हिंगोली या चार जिल्ह्यांतील आठ मंडळात अतिवृष्टी झाली. जोरदार झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी जमीन पाण्याखाली गेली, तर काही ठिकाणी पिके खरडून गेली. 

जालना जिल्ह्यातील ४६ मंडळांत पावसाची हजेरी लागली. बहुतांश मंडळात दमदार पाऊस झाला, तर जालना शहर, अंबड, धनगर पिंपरी, जामखेड, रोहिलागड या पाच मंडळांत अतिवृष्टी झाली. लातूर जिल्ह्यातील २७ मंडळांत हलका पाऊस झाला. बहुतांश मंडळांकडे पावसाची पाठ राहिली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील २८ मंडळांत पाऊस झाला. पारगाव मंडळात अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यातील २९ मंडळांत, परभणी जिल्ह्यातील १९ मंडळांत, औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडळांत, तर बीड जिल्ह्यातील ४९ मंडळांत तुरळक हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदुर घाट मंडळांत अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यातील २७ मंडळांत पाऊस झाला. हिंगोली मंडळात अतिवृष्टी झाली.  .  जालना जिल्हा ः तळणी २६.७५, मंठा ३०.२५, रांजणी ४८.७५, अंतरवली ५०, घनसावंगी २९, बावने २५, शेळगाव २२.७५, परतूर ४८.५०, सुखापुरी ५९.५०, वडीगोद्री३९.५०, गोंदी ३९.५०, पाचनवडगाव ४१, रामनगर २१.७५,वागृळ ६२.२५, टेंभुर्णी २९, माहोरा ३०.५०, जाफराबाद ४०.५०, राजुर २८.५०.

औरंगाबाद जिल्हा ः  औरंगाबाद ३९.५०, उस्मानपुरा ३७.५०, भावसिंगपुरा ४२.२५, कांचनवाडी ३६.२५, चिकलठाणा ४३.५०, चित्ते पिंपळगाव ५२.७५, करमाड ३५, हरसुल २४, चौका २२ , आडूळ ६४.७५, पिंपळवाडी २९.२५, बालानगर ४३.५० , नांदर ३७, पैठण २८.२५, पाचोड ४५, विहामांडवा ३४.५०, वाळुज ४२.२५, सिद्धनाथ २४.५०, वैजापूर ४७.५०, खंडाळा ३५.७५, शिऊर २६.५०, बोरसर ५८.५०, लोणी २८.५० , लासुरगाव २९.२५,महालगाव२९.२५, लाडगाव ४०.५०, वेरूळ २८, सुलतानपूर २९.२५, बाजार ४६.५०, सोयगाव २५.५० सावळदबारा २७.२५. 

बीड जिल्हा ः अमळनेर २०, आष्टी २०, कडा २४.५०, दौलावडगाव २०.५०, पिंपळा ४९.५०, अंबाजोगाई २७.७५, लोखंडी ४१.२५, केज ३७.५०,युसुफ वडगाव ३८.७५, हनुमंत ४७, होळ ३९.५०  अतिवृष्टीची मंडळे  (पाऊस मि.मी) 

जालना शहर १०२ 
अंबड ९२
धनगर पिंपरी १००.२५
जामखेड ८६.२५
रोहिलागड ९४.२५ 
नांदुर घाट ८४.५०
पारगाव ६५.७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT