संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात साडेचार हजार हेक्‍टरवर पीक प्रात्यक्षिके

टीम अॅग्रोवन

नगर  : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्य, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान भरडधान्य आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान गळीतधान्य व तेलताड योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यात ४६२० हेक्‍टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमावर सुमारे तीन कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च होणार आहे.

राज्यात २००७-०८ पासून केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेतील अभियानाचा आढावा घेऊन बाराव्या पंचवार्षिक योजनेत या अभियानाअंर्तगत भात, गहू, कडधान्य व भरडधान्य पीकांचा समावेश करण्यात आला आहे. शासनाने यंदाचे व पुढील वर्ष हे पौष्टिक तृणधान्ये (न्यूट्री सिरियल) वर्ष म्हणून जाहीर केले आहे.

त्यानुसार यंदा जिल्ह्यात पिक प्रात्यक्षिक राबवण्यात येत आहे. तूर, मूग, उडीद, बाजरी, मका, भात, सोयाबीनच्या सलग क्षेत्रासाठी हेक्‍टरी नऊ हजार, पीक प्रात्यक्षिक आधारित क्षेत्रासाठी १५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली. प्रात्यक्षिक हेक्‍टर व कंसात रक्कम : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान ः कडधान्य

  • तूर (सलग) ः ३० (२ लाख ७० हजार)
  • तूर व सोयाबीन (आंतरपीक) ः ३५० (३१ लाख ५० हजार) 
  • मूग (सलग) ः २०० (१८ लाख) 
  • मुगानंतर रब्बी ज्वारी (पीकपद्धतीवर आधारित) ः ३० (४ लाख ५० हजार )
  • मुगानंतर गहू (पीकपद्धतीवर आधारित) १० (चार लाख ५० हजार) 
  • उडीद (सलग) ः १०० (९ लाख) 
  • उडिदानंतर गहू (पीकपद्धतीवर आधारित) ः ३० (४ लाख ५० हजार)
  • बाजरीनंतर हरभरा (पीकपद्धतीवर आधारित) ः ३६० (५४ लाख)
  • राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान ः भरडधान्य

  • बाजरी (सलग) ः ११०० (६६ लाख )
  • मका (सलग) ः ६०० (३६ लाख) 
  • राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान ः गळीतधान्य व तेलताड

  • सोयाबीन (सलग) ः १७०० (१ कोटी २ लाख)
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना

  • भात (सलग) ः १०० (९ लाख).
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

    Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

    Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

    Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

    Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

    SCROLL FOR NEXT