Crop loan distribution starts in Khandesh
Crop loan distribution starts in Khandesh 
मुख्य बातम्या

खानदेशात ‘रब्बी’तील पीक कर्जवाटप सुरू

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात खरिपातील पीक कर्ज वितरण ६० टक्केही पूर्ण झाले नाही. जिल्हा बँका वगळता इतर बँकांची कामगिरी असमाधानकारक राहिली. सध्या रब्बी पिकासंबंधी कर्ज वितरण सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात २७७ कोटी कर्ज वितरण लक्ष्यांक आहे. त्याचे वितरणही संथ गतीने सुरू आहे. 

रब्बी हंगामात केळी, पपई व इतर पिकांसाठी हे कर्ज वितरित केले जाते. त्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना सुमारे २१५ कोटींचा लक्ष्यांक आहे. तर, उर्वरित कर्ज वितरण जिल्हा बँकेला करायचे आहे. वितरण या महिन्यात सुरू झाले. त्याची टक्केवारी अद्याप नेमकेपणे जाहीर झालेली नाही. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे आकड्यांची माहिती घेतली जात आहे. 

खरिपात जळगाव जिल्ह्यात सुमारे २८०० कोटी रुपये पीक कर्ज वितरित करायचे होते. यात सुमारे १६०० कोटी रुपये पीक कर्ज वितरण राष्ट्रीयीकृत बँकांना करायचे होते. तर, उर्वरित जिल्हा बँक, सहकारी, खासगी, व्यापारी व इतर बँकांना करायचे होते. यातील फक्त ६० टक्के कर्ज वितरण पूर्ण झाले आहे. धुळ्यातही खरिपातील कर्जवाटप ६१ टक्केच, तर नंदुरबारात फक्त ६४ टक्के झाले. 

‘लवकर कर्जवाटप करा’

रब्बी हंगामात धुळे जिल्ह्यात धुळे-नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेला पीक कर्ज वितरणाचा लक्ष्यांक नाही. तेथे राष्ट्रीयीकृत बँकांना सुमारे ५७ कोटी रुपये पीक कर्जवाटप करायचे आहे. यातून वितरण सुरू झाले आहे.

नंदुरबारातही सुमारे ४९ कोटी रुपये पीक कर्ज रब्बीसाठी वितरित करायचे आहे. तेथेही पीक कर्ज वितरण राष्ट्रीयीकृत बँकांनी सुरू केले आहे. कर्ज लवकर वितरित करावे. लॉकडाऊन, कोरोनाची कारणे सांगू नयेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT