Crop damage due to canal at Sankh 
मुख्य बातम्या

संख येथील कालव्यामुळे पिकांचे नुकसान

सांगली : संख (ता.जत) येथील मध्यम प्रकल्पाच्या उजवा कालवा जाँकवेल नादुरुस्त झाला. त्यामुळे त्यातून पाणी गळती होऊन संख व भिवर्गी येथील १२ शेतकऱ्यांचे शेतात पाणी साचून १० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

टीम अॅग्रोवन

सांगली : संख (ता.जत) येथील मध्यम प्रकल्पाच्या उजवा कालवा जाँकवेल नादुरुस्त झाला. त्यामुळे त्यातून पाणी गळती होऊन संख व भिवर्गी येथील १२ शेतकऱ्यांचे शेतात पाणी साचून १० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 

पूर्व भागातील संख मध्यम प्रकल्प १९९५ मध्ये झाला आहे. अतिवृष्टीने प्रकल्प ११ वर्षानंतर तुडुंब भरला. जिल्ह्यात साठवण क्षमतेने दुसऱ्या क्रमांकाचा मध्यम प्रकल्प आहे. साठवण क्षमता ७०३ द.घ.ल.फू आहे. ओलिताखाली येणारे क्षेत्र ३ हजार २०० हेक्टर आहे.

मध्यम प्रकल्पातून डावा व उजवा कालवा काढण्यात आला आहे. त्यामध्ये उजवा कालवा १:७ कि.मी व डावा कालवा ३२ कि.मी आहे.मल्लिकार्जुन फुटाणे, शिवराज फुटाणे, राहुल फुटाणे, विठ्ठल फुटाणे, रखमाबाई बिराजदार, संगाप्‍पा फुटाणे, चंद्रशेखर फुटाणे, रावसाहेब मोकाशी, बसवराज फुटाणे, भाऊसाहेब फुटाणे, शिवण्णा वाघोली, विठ्ठल कलादगी यांच्या शेतामध्ये पाणी साचले आहे. तूर, बाजरी, मूग खरीप पिके व रब्बी हंगामातील ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे.

"नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली." - मल्लिकार्जुन फुटाणे, शेतकरी, संख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Red Sandalwood: लाल चंदन प्रकरणावर सहा महिन्यांत निर्णय घ्या

Farmer Support: टंचाईत शेतकऱ्यांना अडचणी भासू देऊ नयेत : पालकमंत्री बोर्डीकर

Farmer Support: गंभीर परिस्थितीत शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री भरणे

Drought Declaration Demands: प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे दुष्काळ जाहीर करा : झनक

Multi State Cooperative Society: एन साई मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला ७ कोटी ९ लाखांचा नफा : ठोंबरे

SCROLL FOR NEXT