राज्यात कापूस बियाणे विक्री २५ मेपासून
राज्यात कापूस बियाणे विक्री २५ मेपासून 
मुख्य बातम्या

राज्यात कापूस बियाणे विक्री २५ मेपासून

टीम अॅग्रोवन

जळगाव ः राज्यातील पूर्वहंगामी कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची कापूस बियाणे खरेदीत फसवणूक होऊ नये, काळाबाजार थांबावा यासंबंधी कापूस बियाण्याची शेतकऱ्यांना २५ मेपासून विक्री करण्यासंबंधीचे नवे आदेश शासनाने नुकतेच जारी केले आहेत. बियाणे वितरक, विक्रेत्यांकडे बियाणे उत्पादकांनी बियाण्याचा पुरवठा विक्रेत्यांकडे सुरू केला आहे. राज्यात सुमारे ४२ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड अपेक्षित आहे. पूर्वहंगामी कापूस लागवड विदर्भ, मराठवाडा, खानदेश, नगर, मालेगाव (जि. नाशिक) भागात अनेक शेतकरी करतात. पूर्वहंगामी लागवडीस २५ मेनंतर सुरवात केली जाते. कापूस लागवडीत जळगाव जिल्हा राज्यात या हंगामात सर्वात पुढे राहणार असून, सुमारे पाच लाख १९ हजार हेक्‍टरवर लागवड अपेक्षित आहे. यात सुमारे ८० ते ८५ हजार हेक्‍टरवर पूर्वहंगामी कापसाची लागवड अपेक्षित आहे. यापाठोपाठ यवतमाळ व विदर्भातील इतर जिल्हे कापूस लागवडीत अग्रेसर  आहेत.  जळगाव जिल्ह्यात गोदामांमध्ये सुमारे अडीच लाख पाकिटे बियाणे दाखल झाले असून, काही कंपन्यांनी आपल्या वितरकांकडे हे बियाणे पाठविले आहे. त्याची विक्री २५ मेपासून करणे बंधनकारक आहे. लागवड १ जूनपासून करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.  काळाबाजार रोखण्यासाठी बदलला निर्णय गुलाबी बोंड अळीला रोखण्यासंबंधी कापूस बियाणे १ जूनपासून शेतकऱ्यांना विक्री करण्याचे आदेश शासनाने बजावले होते. आपल्याकडे बियाणे मिळणार नाही म्हणून खानदेशातील शेतकरी गुजरातेत जाऊन कापूस बियाण्यांची खरेदी करीत होते. यामुळे काळाबाजार व फसवणूक हे प्रकार याची शक्‍यता लक्षात घेता शासनाने कापूस बियाणे २५ मे पासून विक्री करण्याचे आदेश नुकतेच जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकारी कार्यालयास प्रशासनाला दिले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT