सोन्ना, जि. परभणी ः शिवारातील कपाशीची सर्व बोंडे फुटल्यानंतर उभी असलेली पऱ्हाटी.
सोन्ना, जि. परभणी ः शिवारातील कपाशीची सर्व बोंडे फुटल्यानंतर उभी असलेली पऱ्हाटी.  
मुख्य बातम्या

नोव्हेंबरमध्येच कपाशीचा झाडा

टीम अॅग्रोवन

परभणी ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील जिरायती क्षेत्रावरील कापूस पिकांचा यंदा तब्बल तीन ते चार महिने आधीच झाडा झाला आहे. सर्व बोंडे फुटल्यानंतर कापसाची वेचणी केलेल्या शेतामध्ये आता केवळ पऱ्हाटी शिल्लक राहिली आहे. सिंचनाची व्यवस्था असेलेले शेतकरी पऱ्हाटी उपटून हरभरा, गहू घेण्याचे नियोजन करत आहेत. यंदा बीटी कपाशीवर मोठ्या प्रमाणावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बोंडे किडकी झाली आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट आली असून, बाजारभावदेखील कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. यंदाच्या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यामध्ये २ लाख ६९ हजार ७७९ हेक्टर, परभणी जिल्ह्यामध्ये १ लाख ९७ हजार ७०९ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यामध्ये ५४ हजार ६०५ हेक्टरवर, तीन जिल्ह्यांत एकूण ३ लाख ४४ हजार ९३ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. तीनही जिल्ह्यांतील कपाशीच्या क्षेत्रात यंदा घट झाली आहे. जुलै-आॅगस्ट महिन्यांत वाढीच्या काळात पावसाचा खंड पडला. त्यानंतर सुरू झालेल्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने बोंडे सडून नुकसान झाले. यंदा कपाशीवर आलेल्या शेंदरी बोंडअळीमुळेही मोठे नुकसान झाले आहे. त्यात सोयाबीनच्या काढणीच्या हंगामामध्येच कापूस वेचणी आली होती. परंतु मजूर न मिळाल्यामुळे बोंडातून फुटलेला कापूस झाडावरच राहिला. उन्हामध्ये तळल्यामुळे बोंडाचे वजन घटले. दरम्यानच्या काळात झाडावरील उर्वरित बोंडे फुटली. अनेक भागांत फुटलेल्या सर्व बोंडांची वेचणी एकदाच करण्यात आली. यंदा एकाच बहराचे उत्पादन मिळाले. त्यामुळे वेचणीनंतर शेतामध्ये केवळ पऱ्हाटी शिल्लक राहिली आहे. जमिनीतील ओलाव्याच्या उपलब्धतेनुसार जिरायती क्षेत्रावरील कपाशीच्या ४ ते ५ वेचण्या होत. त्यामुळे वेचणी हंगामदेखील फेब्रुवारी-मार्च महिन्यांपर्यंत चालत असे. परंतु यंदा कापसाचा हंगाम तब्बल तीन ते चार महिने लवकर संपला आहे. पऱ्हाटी उपटून हरभरा, गहू पेरणीसाठी जमीन तयार करण्याचे काम शेतकऱ्यांनी सुरू केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT